Marathi News> मनोरंजन
Advertisement

पाहा, बी टाऊनच्या नव्या योगा स्टारची योगसाधना

तिचं हे कौशल्य अनेकांचीच दाद मिळवत आहे.   

पाहा, बी टाऊनच्या नव्या योगा स्टारची योगसाधना

मुंबई :  Coronavirus कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊऩचा कालावधी वाढवल्यानंतर आता थेट तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा सामना सर्वांना करावा लागणार आहे. कोरोनावर मात करण्यासाठी म्हणूनच ही पावलं उचलली जात आहेत. ज्या धर्तीवर नागरिकांनीही या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. सेलिब्रिटी मंडळीही यात मागे नाहीत. 

कलाविश्वातीलही बरेच व्यवहार ठप्प झाल्यामुळे कलाकार मंडळी आता होम क्वारंटाईनच्या या काळात त्यांच्या विरंगुळ्याची साधनं शोधली आहेत. यातच आता चर्चा सुरु आहे ती म्हणजे बी- टाऊनमधील नव्या योगा स्टारची. 

शिल्पा शेट्टी, बिपाशा बासू, सुष्मिता सेन यांच्या मागोमाग आता एकनवोदित अभिनेत्री तिच्या अफलातून कौशल्याने सर्वांनाच थक्क करत आहे. अतिशय लयबद्धतेने योगसाधना करत नेटकऱ्यांना भुवया उंचावण्यास भाग पाडणारी ही अभनेत्री आहे, अलाया एफ. 

'जवानी जानेमन' या चित्रपटातून अभिनेता सैफ अली खान याच्यासह बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अलायाने सोशल मीडियावर काही व्हिडिओ पोस्ट केले आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये 'खो गए हम कहाँ', या गाण्याच्या साथीने योगसाधना करताना दिसत आहे. 

 

दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये ती शरीराला अशा सुरेध पद्धतीने सावरताना दिसते जे पाहता तिच्या कौशल्याचा हेवाच वाटतो. कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच चर्चेत असणारी ही अभिनेत्री सध्या चित्रपटामुळे नव्हे, तर तिच्या सोगसाधनेमुळे सुपरहिट ठरत आहे असं म्हणायला हरकत नाही. 

 

Read More