Marathi News> मनोरंजन
Advertisement

लग्नाआधी मद्यधुंद अवस्थेत आलियानं जे केलं, ते ऐकून रणबीरही असेल Shocked

तिनं जे काही केले ते ऐकून भुवया उंचावत आहेत.   

लग्नाआधी मद्यधुंद अवस्थेत आलियानं जे केलं, ते ऐकून रणबीरही असेल Shocked

मुंबई : सेलिब्रिटींच्या आयुष्यात कधी काय होईल याचा काहीच नेमक नसतो. त्यातही या सेलिब्रिटींच्या आवडीनिवडी आणि त्यांच्या आयुष्यात घडणारे किस्से ऐकून चाहत्यांना वाटणारं आश्चर्य काही औरच. कारण, त्यांचे किस्सेच तसे, चित्रविचित्र. अभिनेत्री आलिया भट्टचंच उदाहरण घ्या. 

'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) या टॉक शोमध्ये आल्यानंतर सेलिब्रिटींची बरीच गुपितं जगासमोर येतात. आलियाचं असंच एक गुपित या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांसमोर आलं. जिथं तिनं मद्यधुंद अवस्थेत असं काही केलं, जे पाहून रणबीरही डोक्यावरच हात मारेल. (Karan Johar)

नुकतंच करण जोहरच्या या कार्यक्रमात अभिनेता विकी कौशल आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानं हजेरी लावली होती. यावेळी करण आणि या दोन्ही अभिनेत्यांच्या गप्पांचा फड चांगलाच रंगला. 

त्याचवेळी करणनं एक किस्सा सांगितला. जेव्हा आलियानं कतरिना- विकीच्या लग्नाआधी विकीला मद्यधुंद अवस्थेत फोन केला होता. तेव्हा आलिया आणि रणबीरही अविवाहित होते. (Alia bhatt called Vicky kaushal)

fallbacks

आलियासोबत त्यावेळी आपण स्वत:ही होतो, असं करणनं सांगितलं. 'आम्ही वाईन पित होतो आणि आकाशातले तारे पाहत होतो. तेव्हा कोणाला बरं फोन करावा, याचाच विचार आम्ही करत होतो. शेवटी आम्ही विकीला फोन केला', असं करण म्हणाला. 

वाचा : दुसऱ्यांदा लग्न करण्यासाठी शाहिदची पत्नी सज्ज; कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया समोर 

 

कतरिना- विकीच्या लग्नाच्या आधीची ही गोष्ट असल्याचं सांगत आपण कतरिनाला आधीपासून ओळखत होतो. विकीशी आपली ओळख मात्र नवी होती, त्यामुळं त्यांच्या लग्नाची बातमी ऐकून आम्हीही भावूक झालो होतो, असंही त्यानं कार्यक्रमात स्पष्ट केलं. 

करणच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सध्या बॉलिवूडमधील कलाकारांची काही अफलातून समीकरणं चाहत्यांसमोर येत आहेत. शिवाय त्यांच्या खासगी आयुष्यात डोकावण्याची संधीही सिनेरसिकांना मिळत आहे. 

Read More