Marathi News> मनोरंजन
Advertisement

Original आलिया राहिली बाजूला, पाहा ही DUPLICATE च वेधतेय लक्ष

रणबीरही गोंधळेल 

Original आलिया राहिली बाजूला, पाहा ही DUPLICATE च वेधतेय लक्ष

मुंबई : सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री दर दिवशी काही ना काही पोस्ट करत असते. या साऱ्यामध्येच तिचा हातांवर मेहंदी लावलेला एक व्हिडीओसुद्धा समोर आला. आलियाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच थेट तिचा असा हातांवर मेहंदी असणारा व्हिडीओ व्हायरल झालेला पाहून थोड्या वेळासाठी चाहत्यांनाही धक्काच बसला. 

आलिया लग्नच करुन समोर येते की काय हा प्रश्न अनेकांनीच उपस्थित केला. ज्यानंतर आता एक अतिशय रंजक अशी माहिती समोर आली आहे. 

सर्वात प्रहिलं, तर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून प्रत्येकानेच त्यांच्या परिने तर्क लावण्यास सुरुवात केली. पण, मुळात मात्र या व्हिडीओमध्ये दिसणारी ही मुलगी आलिया भट्ट हिची ड्यूप्लिकेट असल्याचं म्हटलं जात आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ आहे, सेलेस्टी बैरागे या तरुणीचा. ती मुळची आसामची आहे. सेलेस्टीचा चेहरा आलियाशी बराच मिळताजुळता आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by (@celesti.bairagey)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by  (@celesti.bairagey)

गालावरची खळी म्हणू नका किंवा ते निरागस स्मितहास्य. सेलेस्टीला पाहून तुम्ही आम्हीच नव्हे, तर आलियाचा प्रियकर अभिनेता रणबीर कपूरही गोंधळून जाईल यात शंकाच नाही. 

Read More