Guess This Actress: 1999 मध्ये आलेल्या प्रीती झिंटाच्या 'संघर्ष' चित्रपटात एका गोंडस, निरागस मुलीने चाइल्ड आर्टिस्ट म्हणून पदार्पण केलं होतं. त्या छोट्या भूमिकेने अवघ्या 6 व्या वर्षीच प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. हिच छोटी मुलगी आज बॉलिवूडवर अधिराज्य गाजवत आहे. कोण आहे ही मुलगी? पाहूयात सविस्तर
दरम्यान, आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहेत ती अभिनेत्री आलिया भट्ट आहे. 'संघर्ष' चित्रपटात आलियाने प्रीती झिंटाच्या लहानपणीच्या भूमिकेतून आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. केवळ सहा वर्षांची असतानाही तिची अभिनयातील पकड आणि निरागसता सर्वांच्या मनात घर करून गेली होती. विशेष म्हणजे त्या भूमिकेसाठी आलियाला 15 लाख रुपये मानधन मिळाले होते. जे त्या काळात एका चाइल्ड आर्टिस्टसाठी मोठी रक्कम होती.
या चित्रपटातून आलियाला मिळाली प्रसिद्धी
आलिया भट्ट ही भट्ट फिल्मी कुटुंबातील सदस्य आहे. तिचे वडील महेश भट्ट हे नामवंत दिग्दर्शक व निर्माता असून आई सोनी राजदान या देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. जन्मतःच चित्रपटसृष्टीशी संबंधित असले तरी आलियाने आपल्या मेहनतीने आणि अभिनय कौशल्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
2012 मध्ये करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून आलियाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. 'राजी', 'गली बॉय', 'उडता पंजाब', 'गंगूबाई काठियावाडी', आणि 'ब्रह्मास्त्र' यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांनी तिने स्वतःचा ठसा उमटवला.
32 व्या वर्षी 550 कोटींची मालकीण
आज 32 वर्षांची झालेली आलिया भट्ट सुमारे 550 कोटी रुपयांची मालकिण असून एका चित्रपटासाठी ती जवळपास 15 कोटी रुपये घेत असल्याचे बोलले जाते. अभिनयासोबतच ती एक यशस्वी व्यावसायिकही आहे. 2020 मध्ये तिने स्वतःचं प्रोडक्शन हाऊस ‘इटरनल सनशाइन प्रोडक्शन्स’ सुरू केलं.
2022 हे वर्ष आलियासाठी वैयक्तिक जीवनातही खूप खास ठरलं. याच वर्षी तिने अभिनेता रणबीर कपूरसोबत विवाह केला आणि वर्ष अखेरीस दोघंही एका गोंडस मुलीचे पालक झाले. त्यांच्या मुलीचे नाव राहा आहे.
चित्रपटसृष्टीतील कुटुंबातून आलेली असली तरी स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर आलिया भट्टने आज इंडस्ट्रीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे आणि ती आजच्या घडीला बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.