Marathi News> मनोरंजन
Advertisement

'त्या' व्यक्तीला रडू नकोस... म्हणता म्हणात स्वत: आलियाच भावूक; Video Viral

तिची भावनिक बाजूही पाहायला मिळाली.   

'त्या' व्यक्तीला रडू नकोस... म्हणता म्हणात स्वत: आलियाच भावूक; Video Viral

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही कायमच तिच्या मनमिळाऊ स्वभावासाठी ओळखली जाते. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीशी आलियाचं खास नातं आहे. कलाजगतामध्येही आलिया तिच्या याच स्वभावासाठी ओळखली जाते. विविध कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर आपल्या अनोख्या स्वभावानं ती कार्यक्रमाची शोभा वाढवते. 

अशाच एका कार्यक्रमाला आलिया गेली होती. जिथे तिची भावनिक बाजूही पाहायला मिळाली. 

सोशल मीडियावर सध्या आलियाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आलियाला एक खास व्यक्ती भेटते आणि नंतर त्या दोघींमध्ये होणारा संवाद खूप काही सांगून जातो. 

व्हिडीओमध्ये दिसत असल्यानुसार आलिया स्टेजवर चहा पित असतानाच तिथे एक चाहती येते. 

तिथून ती जोरजोरात आलियाच्या नावाने हाका मारताना दिसते. आलियाही तिला पाहून आनंदात तिचं प्रेम स्वीकारते. मला तुझा चेहरा लक्षात आहे, असंच आलिया त्या चाहतीला सांगताना दिसते. 

आलियाचे हे उदगार ऐकून या चाहतीच्या भावना उफाळून येतात आणि ती रडू लागते. हे पाहून आलियाही काहीशी भावूक होते आणि तिला रडू नकोस... असं सांगताना दिसते. 

मी तुला भेटेन असं आश्वासन देणारी आलिया पाहताना आपल्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांशी तिचं असणारं एक अतुट नातं यानिमित्तानं समोर येत आहे. 

Read More