Marathi News> मनोरंजन
Advertisement

Alia-Ranbir च्या राहाला पाहा; Christmas च्या निमित्तानं अखेर दाखवली लेकिची झलक

Alia Bhatt -Ranbir Kapoor : अभिनेत्री (Alia bhatt) आलिया भट्ट हिनं, काही दिवसांपूर्वीच तिच्या लेकिला जन्म दिला. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याच्याशी लग्नगाठ बांधल्यानंतर आलियानं काही महिन्यांतच तिच्या गरोदरपणाची माहिती दिली 

Alia-Ranbir च्या राहाला पाहा; Christmas च्या निमित्तानं अखेर दाखवली लेकिची झलक

Alia Bhatt -Ranbir Kapoor : अभिनेत्री (आलिया भट्ट हिनं, काही दिवसांपूर्वीच तिच्या लेकिला जन्म दिला. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याच्याशी लग्नगाठ बांधल्यानंतर आलियानं काही महिन्यांतच तिच्या गरोदरपणाची माहिती दिली आणि यानंतर एका गोड परीनं त्यांच्या या नात्यात प्रवेश केला. तिच्या येण्यानं रणबीर आणि आलियाचं नातं पुरतं बदललं. एका नव्या सदस्याच्या येण्यानं त्यांचं कुटुंब परिपूर्ण झालं. राहा, असं नाव ठेवत या सेलिब्रिटी जोडीनं त्यांच्या लेकिला नवी ओळख दिली. (Bollywood Actress Alia bhatt ranbir kapoor shares their daughters first photo )

राहाच्या (Raha Kapoor) जन्मानंतर आलिया आणि रणबीरवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला, तो आजतागायत सुरुच आहे. या साऱ्यामध्येच आनंदाच्या दिवसांची सुरुवात झाली आणि ख्रिसमस येऊन ठेपला. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कपूर कुटुंबीयांच्या (Kapoor Family Christmas celebration) ख्रिसमस सेलिब्रेशनची चाहत्यांना उत्सुकला लागून राहिली होती. लग्नानंतर आलियाचं हे सेलिब्रेशन आणखी खास होतं, कारण यावेळी तिच्या लेकीचीही साथ लाभली होती. सगळीकडेच  राहाची चर्चा सुरु असताना आलिया यावेळी तरी तिच्या लेकीची पहिली झलक चाहत्यांना दाखवणार का? याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिली. अखेर ज्याची प्रतीक्षा होती तो क्षण आलाच. 

आलियानं शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसली राहा (Ranbir Alia Daughter) 

(Alia Bhatt Christmas Celebration Photos) आलिया भट्टनं तिच्या घरात सुरु असणाऱ्या ख्रिसमस सेलिब्रेशनचे काही फोटो चाहत्यांच्या भेटीला आणले. यामध्ये तिचा उत्साह आणि आनंद पाहण्याजोगा होता. या सर्व फोटोंच्या गर्दीत एका गोष्टीनं सर्वांच्याच नजरा वळवल्या. ती म्हणजे, राहाची पहिली झलक. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटोंमध्ये राहाचं नाव अगदी स्पष्ट दिसलं आणि नेटकऱ्यांनी यातही समाधान मानलं. रणबीर- आलियाच्या घरात एका ख्रिसमस ट्रीवर राहाच्या नावाचा फुगा लावण्यात आला होता. 

हेसुद्धा पाहा : Sonam Kapoor नं मुलगा वायूसाठी घेतला हा मोठा निर्णय, पापाराझींना बसला धक्का

राहाचं नावही खूप काही सांगून गेलं. पण, तिची पहिली झलक पाहण्याचं चाहत्यांचं स्वप्न मात्र अपूर्णच राहिलं असं म्हणायला हरकत नाही. 

fallbacks

इतर सेलिब्रिटींप्रमाणेच आलियानंही... 

आतापर्यंत बऱ्याच सेलिब्रिटींनी त्यांच्या मुलांचा चेहरा सोशल मीडियावर दाखवलेला नाही. लहानग्यांना या विश्वाची जाण होईपर्यंततरी त्यांना त्याबद्दलची माहिती देणार नाही, असाच पवित्रा काहींनी सोशल मीडियाच्या बाबतीत घेतला आहे. तर, काहींची भूमिकेमागे वेगळी धारणा आहे. प्रियांका चोप्रा, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, बिपाशा बासू यांच्यामागोमाग आपल्या बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर न करणाऱ्यांमध्ये आता आलियाच्या नावाचीही भर पडली आहे. 

TAGS

Alia Bhattranbir kapoorRaha KapoorAlia Bhatt Ranbir Kapoor DaughterChristmas Celebrationआलिया भट्टरणबीर कपूरआलिया रणबीरकपूर कुटुंबchristmas 2022Bollywood Christmas Celebrationmarathi newsEntertainmentbollywoodमनोरंजन बातम्याबॉलीवूड बातम्याताज्या मनोरंजन बातम्यामनोरंजन मराठी बातम्यासिनेमा न्युजचलपती रावentertainment news in marathiLatest Entertainment NewsLatest News EntertainmentLatest Bollywood Newsbollywood news todayEntertainment News TodayMarathi Entertainment newsmarathi bollywood newsmarathi news todaylatest marathi newsMarathi breaking newsMarathi Breaking News Todaymarathi news liveमराठी बातम्याताज्या मराठी बातम्यामराठी ब्रेकिंग न्युजzee 24 taas marathi news livezee 24 taas marathi newsझी मराठी बातम्याझी २४ तासझी २४ तास मराठीझी २४ तास ताज्या बातम्याआजच्या ताज्या बातम्याताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजआजच्या मराठी बातम्यामहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्या
Read More