Marathi News> मनोरंजन
Advertisement

... तेव्हापासूनच रणबीरच्या प्रेमात, आलियाचा खुलासा

 एका मुलाखतीत रणबीरने आपण आलियासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची बाब स्वीकारली होती.

... तेव्हापासूनच रणबीरच्या प्रेमात, आलियाचा खुलासा

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्यामध्ये असणारं नातं आता सर्वज्ञात झालं आहे. 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाच्या सेटवर जास्तीत जास्त काळ एकमेकांसोबत व्यतीत करणाही ही जोडी आता खुलेपणाने त्यांच्या नात्याविषयी बोलू लागली आहे. त्यामुळे 'खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो....', असं म्हणतच जणू काही ते आपल्या या नात्याची ग्वाही देत आहेत असं म्हणायला हरकत नाही. 

काही महिन्यांपूर्वीच एका मुलाखतीत रणबीरने आपण आलियासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची बाब स्वीकारली होती. ज्यानंतर आता आलियानेही ती नेमका रणबीर तिला कधीपासून आवडत होता, याचा खुलासा केला आहे. 

'अॅक्ट्रेसेस राऊंड टेबल' या मुलाखत सत्राच्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळी हॉलिवूड अभिनेत्यांपैकी कोण तुमचा क्रश होता, अशा आशयाचा प्रश्न उपस्थित अभिनेत्रींना विचारण्यात आला तेव्हा आलियाने यापूर्वीच दिलेल्या उत्तराचं पुनरुच्चारण केल्याचं पाहायला मिळालं. 

'रणबीर...', असं ती उत्तरली. त्यावर तुझ्या खोलीत त्याचे पोस्टर वगैरे होते का, असा प्रश्न अनुष्का शर्माने तिला विचारला. त्यावर 'नाही...', असं म्हणत 'पोस्टर नसले तरीही त्याच्या फोटोंकडे मी एकटक, एकसारखी पाहत असायचे' असं तिने स्पष्ट केलं. 

रणबीरसोबतच्या पहिल्या भेटीविषयी सांगत आलिया म्हणाली, ''मी त्याला तेव्हा पाहिलं होतं जेव्हा मी ११ वर्षांची होते. 'ब्लॅक' या चित्रपटासाठी मी ऑडिशन दिली होती. तेव्हापासूनच मला त्याच्यावर क्रश आहे, तो मला तेव्हापासून आवडतो. त्यानंतर तो 'सावरियाँ' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण, त्याआधीच मी त्याला पाहिलेलं होतं.''

रणबीरवर असणाऱ्या प्रेमापोटी आलियाच्या चेहऱ्यावर यावेळी असणारे निरागस भावही पाहण्याजोगे होते. आलिया आणि रणबीर यांचं नातं आता साऱ्या कलाविश्वात अनेकांचच लक्ष वेधत असून यंदाच्या वर्षी त्यांच्या नात्यात नेमकं कोणतं वळण येणार, ते लग्नाचा निर्णय़ घेणार का याकडेच सर्वाचं लक्ष लागलेलं आहे. 

 

Read More