Marathi News> मनोरंजन
Advertisement

Ohhh! आलियाला गरोदरपणात कसले डोहाळे लागले पाहिलं का?

डोहाळे पुरवा हिचे डोहाळे पुरवा 

Ohhh! आलियाला गरोदरपणात कसले डोहाळे लागले पाहिलं का?

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिनं काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या गरोदरपणाची बातमी जाहीर केली. लग्नाला दोन महिने उलटल्यानंतरच आलियानं ही गोड बातमी जाहीर केल्यामुळं याबाबतच्या बऱ्याच चर्चाही झाल्या. चहूबाजुंनी आलिया आणि रणबीरवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. (Bollywood Actress alia bhatt shares pregnancy cravings see photo)

आता तुम्ही म्हणाल आलिया गरोदरपणात आराम करत असेल, पण तसं नाहीय. तिनं गरोदरपणातही आपलं काम सुरुच ठेवलं आहे. आवडीनिवडी जपण्यावरही ती भर देताना दिसत आहे.

तिनं नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट केली, त्यावरूनही नेटकऱ्यांचं कुतूहल चाळवलं. कारण, या पोस्टमध्ये एक गोडाचा पदार्थ आणि कसलंसं पुस्तक दिसत आहे. 

आलियानं शेअर केलेलं इन्स्टा स्टेटस पाहून त्यामध्ये असणारा पदार्थ पाहता तिला, याचे डोहाळे तर लागले नाही नाही अशा शब्दांत नेटकरी व्यक्त होत आहेत. काहींनी तर, रणबीरचा उल्लेख करत तिचे डोहाळे पुरवण्याचा सल्लाही दिला आहे. आलियानं शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिरामिसू, हा पदार्थ दिसत आहे. 

fallbacks

पदार्थ फारच सुंदर दिसत आहे, इतका की तो पाहून चव चाखण्याची इच्छा तुमच्याही मनात घर करेल. तेव्हा आलियाला लागलेले डोहाळे ठाऊक नाहीत, पण तुम्ही हा पदार्थ कधी चाखताय हे पाहणं औत्सुक्याचं. 

Read More