Marathi News> मनोरंजन
Advertisement

Alia – Ranbir Wedding : मनिष मल्होत्राला डावलून आलियाची 'या' सेलिब्रिटी डिझायनरला पसंती

 आलिया- रणबीरचं लग्न म्हटल्यानंतरच चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला

Alia – Ranbir Wedding : मनिष मल्होत्राला डावलून आलियाची 'या' सेलिब्रिटी डिझायनरला पसंती

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. आलिया- रणबीरचं लग्न म्हटल्यानंतरच चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. लग्नाला कोण येणार, लग्न कुठे होणार इथपासून लग्नाला आलियाचा लूक कसा असणार असे अनेक प्रश्न चाहत्यांनी विचारण्यास सुरुवात केली. (Bollywood Alia bhatt Ranbir Kapoor wedding)

तिथं कपूर आणि भट्ट कुटुंबीय या लग्नाच्या तयारीला लागलेले असतानाच इथं त्यांच्या लग्नासंबंधीची मोठी माहिती समोर आली आहे.

आलियाचं लग्न म्हटलं की, त्यामध्ये आता कोणत्या सेलिब्रिटी फ्रशन डिझायनरला ती पसंती देणार हा प्रश्न आलाच. आलियाची डिझायनर मनिष मल्होत्रा याच्याशी तशी जुनी ओळख.

आलियाच्या पहिल्या चित्रपटापासून तिची मनिषशी गट्टी जुळली. विविध कार्यक्रमांसाठीसुद्धा ती त्यानं डिझाईन केलेल्या आऊटफिटला पसंती देताना दिसली.

साधारणपणे कोणत्याही वेडिंग लेहंग्याची किंवा आऊटफिची मागणी असल्याच त्याची तयारी बरेच महिने आधी सुरु होते. पण, मनिष मल्होत्राच्या टीमनं दिलेल्या माहितीनुसार असं काहीच अद्यापही इथं घडलेलं नाही.

परिणामी आलियाच्या लग्नाच मनिष मल्होत्राचा डिझायनर लेहंगा नसण्याची चिन्हं आता समोर येत आहेत. पण, मनिष लग्नात पाहुणा म्हणून नक्कीच हजर असेल.

सध्याच्या घडीला सब्यसाची ब्रायडल लेहंग्यालाच अभिनेत्री पसंती देताना दिसत आहेत. त्यामुळं आलियासुद्धा सब्यसाचीच्याच डिझायनर लेहंग्याला पसंती देणार असल्याचं म्हटलं जात आहे.

तेव्हा आता आलियासाठी कोणता लेहंगा खास तयार केला जातोय हेच पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Read More