Marathi News> मनोरंजन
Advertisement

पाहा आलियाची होणारी, 'जाऊबाई जोरात'

अवघ्या काही दिवसांतच विवाहबंधनात अडकणार 

पाहा आलियाची होणारी, 'जाऊबाई जोरात'

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर याच्याशी नाव जोडलं जाण्याच्या क्षणापासूनच आलिया भट्ट हिचंही कपूर कुटुंबाशी नातं जोडलं गेलं. आता तरही जोडी अवघ्या काही दिवसांतच विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण, कपूर कुटुंबात आलियाच्या आधी तिचा दीर म्हणजेच अभिनेता आदर जैन, लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.  

सूत्रांच्या माहितीनुसार आदर, रणबीरच्याही आधी त्याची प्रेयसी, अभिनेत्री तारा सुतारिया हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. 

तारा आणि आदरनं मागील वर्षीच त्यांच्या नात्याची जाहीर ग्वाही दिली होती. 

fallbacks

आदरची प्रेयसी, तारा ही सौंदर्याच्या आणि मादकतेच्या बाबतीत आलियालाही टक्कर देत आहे. ज्यामुळं खऱ्या अर्थानं ती 'जाऊबाई जोरात' आहे, असंच म्हणावं लागेल. 

आदर हा रणबीरची आत्या, रिमा जैन यांचा मुलगा आहे. ज्यामुळं नात्यानं तो रणबीरचा भाऊ आहे. 

fallbacks

आता हे पाहणं महत्त्वाचं ठरेल, की आलिया आणि रणबीर लग्न करण्यात बाजी मारतात की त्यांना मागे टाकत आदर- तारा त्यांच्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात करतात. 

Read More