Marathi News> मनोरंजन
Advertisement

वयानं लहान, पाकिस्तानी अभिनेत्यासोबत Ameesha Patel चा Romantic Video समोर

अमिषा कोणाच्या प्रेमात पडलीये? तुम्हालाही पडतोय ना प्रश्न? 

वयानं लहान, पाकिस्तानी अभिनेत्यासोबत Ameesha Patel चा Romantic Video समोर

Ameesha Patel Dating: Bollywood अभिनेत्री अमिषा पटेल सध्या तिच्या आगामी चित्रपटांपेक्षा एका बलत्याच कारणामुळे चर्चेत आहे. हे कारण म्हणजे तिच्या बोल्ड पोस्ट. आता तर म्हणे अमिषा बोल्डनेसच्याही पलिकडे गेली असून, तिच्या प्रेमप्रकरणांच्याही बऱ्याच चर्चा होऊ लागल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार आतापर्यंत सिंगल असणाऱ्या अमिषाला वयाच्या 46 व्या वर्षी प्रेमाचं आणि हक्काचं माणूस भेटलं आहे. वयानं लहान असणाऱ्या या प्रेमाच्या माणसासोबतचा एक व्हिडीओसुद्धा अमिषानं तिच्या सोशल मीडिया पेजवरून शेअर केला आहे. 

अमिषा कोणाच्या प्रेमात पडलीये? तुम्हालाही पडतोय ना प्रश्न? तर, या बॉलिवूड अभिनेत्रीनं एका पाकिस्तानी अभिनेत्यासोबतचा रोमँटीक व्हिडीओ शेअर केल्यामुळं एकच खळबळ माजू लागली आहे. तिच्यासोबत या व्हिडीओमध्ये दिसणारा अभिनेता आहे, इमरान अब्बास. (Bollywood Actress Ameesha Patel shares Imran Abbas Video)

कुठे झाली पहिली ओळख? 
अमिषा (Ameesha Patel ) आणि इमरानच्या नात्याची चर्चा त्यांचा रोमँटिक व्हिडीओ व्हायरल होताच आणखी फोफावू लागली. बाहरिनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात त्यांची पहिली ओळख झाली होती. या दोघांनीही एकत्र चांगला वेळ व्यतीत केला. सोशल मीडियावर येणारे व्हिडीओ पाहून हे लगेचच लक्षात येत आहे. 

वाचा : रातोरात चर्चेत 'मोदीजी की बेटी' तुम्ही पाहिली का? Video Viral

अमिषाच्या व्हिडीओमध्ये (Viral Video) नेमकं काय? 
अमिषा पटेल आणि इमरानच्या या व्हिडीओमध्ये ते दोघं ‘दिल में दर्द सा जगा है..’ या गाण्यावर परफॉर्म करताना दिसत आहेत. गाण्याचे बोल आहेत त्याचप्रमाणे अमिषाची आणि इमरानची केमिस्ट्रीही पाहायला मिळत आहे. तिथं या नात्याची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे मात्र या बॉलिवूड अभिनेत्रीनं इमरान आपला चांगला मित्र असल्याचं सांगते. 

Read More