Marathi News> मनोरंजन
Advertisement

नवविवाहित Ankita Lokhande च्या संपत्तीचा आकडा मोठ्या अभिनेत्रींनाही लाजवणारा

अंकिता कोट्यवधींची मालकीण....

नवविवाहित Ankita Lokhande च्या संपत्तीचा आकडा मोठ्या अभिनेत्रींनाही लाजवणारा

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिच्या करिअरची सुरुवात 'पवित्र रिश्ता' या मालिकेपासून केली. सुरुवातीपासूनच या मालिकेला प्रेक्षकांची कमाल लोकप्रियता मिळाली. पाहता पाहता टेलिव्हिजन वर्तुळात अंकिता लोखंडे हिनं तिची वेगळी ओळखही निर्माण केली. 

पुढे अंकिताच्या कारकिर्दीचा प्रवास चित्रपटांपर्यंत पोहोचला. जिथं ती सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकली होती. 

अंकितानं तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत बरेच चढऊतार पाहिले. ज्यानंतर तिनं खासगी आयुष्यातही अनेक गोष्टींचा सामना केला. 

जीवनातील प्रत्येक प्रसंगाचा सामना करणाऱ्या अंकितानं आतापर्यंत गाठलेली उंची ही वाखाणण्याजोगी आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार तिच्या संपत्तीचा आकडा 23 कोटींवर पोहोचला आहे. आता तुम्ही म्हणाल तिच्या संपत्तीचा आकडा इतका वर गेला तरी कसा? 

तर, टेलिव्हिजन वर्तुळात अंकिता ही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. एका एपिसोडसाठी ती जवळपास 1.15 लाख रुपये इतकं मानधन आकारते. (Ankita Lokhande)

फक्त मालिकाच नव्हे, तर चित्रपटांमध्येही अंकिता झळकली आहे. आलिशान जीवनशैलीचा आस्वाद घेणाऱ्या या अभिनेत्रीकडे  Porshe 718 Boxster S ही एक कोटी रुपयांची कार आहे. 

70 लाख रुपयांची जॅगुआर एक्सएफ ही कारही तिच्याकडे आहे. मुंबईत अंकिताचा स्वत:चा फ्लॅटही आहे. 

विविध ब्रँडच्या जाहिराती, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून तिच्या मानधनाचा आकडा असाच उंचावत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Read More