Marathi News> मनोरंजन
Advertisement

अनुष्काचा असा फोटो पाहून विराटचं मन उडूउडू झालं...

अनुष्काला पाहून तिचा ....

अनुष्काचा असा फोटो पाहून विराटचं मन उडूउडू झालं...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिनं एका मुलीला जन्म दिला, ज्यानंतर तिनं पुन्हा स्वत:कडेही तितकंच लक्ष दिलं. मुलीची काळजी घेण्याला अनुष्का आणि तिचा पती, क्रिकेटपटू विराट कोहली यानं प्राधान्य दिलं. याचवेळी अनुष्कानं काही गोष्टी प्रकर्षानं पाळल्या. 

सहसा गरोदरपणा, प्रसूतीनंतर महिला त्यांच्या शरीराच्या बांध्याबाबत बऱ्याच चिंतातूर असल्याचं पाहायला मिळतं.

हीच चिंता त्यांना स्वत:ची काळजी घेण्याच्या मार्गावर आणून सोडते. अनुष्कानंही अगदी तेच केलं. 

योग्य व्यायाम आणि तितकाच सकस आहार याच्या बळावर तिनं पुन्हा एकदा सुडौल बांधा कमवला आणि फॅशन जगतात ती मोठ्या ताकदीनं परतली. 

हल्लीच अनुष्कानं तिचा एक अतिशय सुंदर फोटो पोस्ट केला. ज्यामध्ये ती निऑन ग्रीन या रंगाच्या स्वीमसूटमध्ये दिसत आहे. 

अनुष्काच्या चेहऱ्यावर खुललेलं हास्य या फोटोमध्ये तिचा लूक परिपूर्ण करत आहे. 

अनुष्काच्या या फोटोवर अनेकांनीच कमेंट्स केल्या आहेत. यामध्य़े तिचा सर्वात मोठा फॉलोअरही मागे राहिलेला नाही. 

अनुष्काचा सर्वात मोठा आणि एकनिष्ठ फॉलोअर म्हणजे तिचा पती, क्रिकेटपटू विराट कोहली. 

विराटनं अनुष्काच्या फोटोवर हार्ट शेप इमोजी शेअर करत, तिच्या या लूकला दाद दिली आहे. थोडक्यात पत्नीचा हा अंदाज पाहून त्याचं मन उडूउडू झालं, असं म्हणायला हरकत नाही. 

विराट आणि अनुष्का ही जोडी, चाहत्यांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये अग्रस्थानी असते. 

फक्त एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करण्यापर्यंतच नव्हे, तर नातं जपत प्रत्येक पावलावरव एकमेकांची साथ देत ही जोडी कायमच सर्वांपुढे काही आदर्श प्रस्थापित करताना दिसते. 

Read More