Marathi News> मनोरंजन
Advertisement

ए बाई! पाणीपुरीसारखी फुगशील; बॉलिवूड अभिनेत्रीला पाहून कोणाची जीभ घसरली?

न रुचणाऱ्या भूमिका साकारतात तेव्हा मात्र याच कलाकारांची खिल्ली उडवण्यात येते. 

ए बाई! पाणीपुरीसारखी फुगशील; बॉलिवूड अभिनेत्रीला पाहून कोणाची जीभ घसरली?

मुंबई : बॉलिवूड कलाकार ज्यावेळी रुपेरी पडद्यावर झळकतात तेव्हा त्यांच्या रुपाची अमाप प्रशंसा केली जाते. पण, जेव्हा हेच कलाकार आपल्याला न रुचणाऱ्या भूमिका साकारतात तेव्हा मात्र याच कलाकारांची खिल्ली उडवण्यात येते. अनेकदा तर त्यांच्या शरीरावरही अभद्र कमेंट केल्या जातात. 

सध्या एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत हाच प्रकार घडताना दिसत आहे. जिथं थेट तिच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर ट्रोलर्सनं निशाणा साधला. 

सोशल मीडियावर सक्रिय असणारी ही अभिनेत्री आहे, भूमी पेडणेकर. तिनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये भूमी गोलगप्पा/ पाणीपुरी खातना दिसत आहे. 

इतक्यावरच न थांबता ती चाटही खाताना दिसत आहे. भूमीच्या मते, दिल्लीच्या चाटची चव तिच्या मनात घर करून बसली आहे. 

मुंबईकरांनो यावर तुमचं म्हणणं वेगळं असूच शकतं. पण, इथे मुद्दा चाटपुरताच मर्यादित न राहता भूमीच्या खाण्यापिण्याच्या सवयीवरच अनेकांनी निशाणा साधला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhumi  (@bhumipednekar)

दीदी... परत पाणीपुरीसारखीच होशील.... असं म्हणत तिची अनेकांनीच खिल्ली उडवली. कोणी तिच्या हास्यावरही निशाणा साधला. 

आता मुद्दा असा, की प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये सोशल मीडियामुळं एक मोठं अंतर कमी झालं. पण, खरंच ही दरी कमी होताना कुठंतरी मर्यादांचा विसर मात्र पडला आणि ही बाब नक्कीच चांगली नाही. 

Read More