Marathi News> मनोरंजन
Advertisement

लग्नाच्या पत्रिकेतील 'त्या' चुकीमुळे दीपिका ट्रोल

दीपावलीच्या उत्साहाचे वारे सध्या सर्वत्र वाहत आहेत. त्यासोबतच आता यामध्ये जोड मिळाली आहे ती म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या लग्नाची. 

लग्नाच्या पत्रिकेतील 'त्या' चुकीमुळे दीपिका ट्रोल

मुंबई : दीपावलीच्या उत्साहाचे वारे सध्या सर्वत्र वाहत आहेत. त्यासोबतच आता यामध्ये जोड मिळाली आहे ती म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या लग्नाची. 

रणवीर आणि दीपिका या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा करत एक पत्रक पोस्ट केलं. 

अतिशय सुरेख आणि सोबर अशा स्वरुपातील हे पत्रक हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये पोस्ट करण्यात आलं होतं. 

लग्नाची तारीख वगळता इतर कोणत्याही गोष्टीचा उल्लेख त्यात करण्यात आला नव्हता. पण, चाहत्यांना तेवढी माहितीही पुरेशी झाली. 

दीप-वीरच्या पोस्टनंतर अनेकांनीच त्यांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. पण, त्यातही काही नेटकऱ्यांनी याती चुकांमुळेही एका नव्या विषयाला तोंड फोडलं. 

fallbacks

लग्नाची घोषणा करण्यासाठीच्या या पत्रकात 'दीपिका', असं लिहिण्याऐवजी 'दीपीका' असं लिहिण्यात आलं होतं. 

त्यामुळे लेखन नियमांकडे लक्ष वेधत तुम्ही दीपिकाचं नाव असं लिहिता का, असा प्रश्नही काही नेटकऱ्यांनी विचारला. 

fallbacks

सोशल मीडियावर होणाऱ्या या चर्चा काही वेळानंतर शमल्याही. पण, तरीही या अशा चर्चांकडेही इतरजण किती रंजकतेनं पाहतात हा मुद्दाही इथे लक्ष देण्याजोगा आहे. 

fallbacks

fallbacks

 

Read More