Marathi News> मनोरंजन
Advertisement

तिरुपतीनंतरही दीपिका- रणवीरचं देवदर्शन सुरुच

आता सहकुटुंब पोहोचले या ठिकाणी..... 

तिरुपतीनंतरही दीपिका- रणवीरचं देवदर्शन सुरुच

अमृतसर : लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिरुपतीच्या दर्शनाला गेलेल्या अभिनेत्री दीपिका पदुकोण Deepika Padukone आणि तिचा पती अभिनेता रणवीर सिंग Ranveer Singh यांनी त्यांच्या वैवाहिक नात्याची ही वर्षपूर्वी एका अनोख्या मार्गाने साजार करण्याला प्राधान्य दिलं आहे. व्यकंटेश्वराच्या दर्शनानंतर ही जोडी आपआपल्या कुटुंबांसह थेट अमृतसरला पोहोचली. 

अमृतसर येथील सुवर्णमंदिराला भेट देत त्यांनी आपल्या नात्याच्या नव्या प्रवासाची नवी सुरुवात केली. दीपिका आणि रणवीर सुवर्णमंदिरात आल्याचं कळत तेथी आजूबाजूच्या परिसरात बराच उत्साह पाहायला मिळाला होता. मंदिर प्रशासनाने त्यांच्या येण्यानिमित्ताने या ठिकाणी सर्व व्यवस्था केली होती. दीप-वीरने सोशल मीडियावरही या खास क्षणांचे फोटो पोस्ट केले. 

दीपिका आणि रणवीर या दोघांचा लूक यावेळीही पाहण्याजोगा होता. मरुन रंगाचा सलवार सूट घालत दीपिकाने तिचा हा लूक जाळीदार ओढणीने पूर्ण केला होता. तर, रणवीरनेही तिच्या कपड्यांना शोभून दिसेल अशी मरुन छटा आणि फ्लोरल प्रिंट असणारी शेरवानी घातली होती. दोघांचे कुटुंबीयसुद्धा यावेळी पारंपरिक वेशभूषेत दिसले. रणवीरचे वडील जगजीत भवनानी, आई अंजू आणि बहीण रितीका यांच्यासोबतच दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण, आई उज्जाला आणि बहीण अनिशा यांच्या चेहऱ्यावरी समाधानकारक आनंदाची भावना पाहण्याजोगी होती. 

fallbacks
छाया सौजन्य- फिल्मफेअर/ इन्स्टाग्राम 

 

fallbacks
छाया सौजन्य- फिल्मफेअर/ इन्स्टाग्राम 

अमृतसरला जाण्यापूर्वी ही जोडी तिरुपती येथे पोहोचली होती. त्यावेळीसुद्धा त्यांच्यावर अनेकांच्याच नजरा खिळल्या होत्या. कामाच्या व्यापातून लग्नाला एक वर्ष पूर्ण होत असल्याचा दिवस या दोघांनीही आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. त्यांचा हा अंदाज चाहत्यांचीही मनं जिंकून गेला. 

Read More