Marathi News> मनोरंजन
Advertisement

Details Inside! रणवीर- दीपिकाच्या रिसेप्शनविषयीची 'ही' माहिती उघड

यांचा थाट भारी... सगळंच लय भारी!

Details Inside! रणवीर- दीपिकाच्या रिसेप्शनविषयीची 'ही' माहिती उघड

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्याच्या घडीला कोणा एका चित्रपटाच्या प्रदर्शनाची किंवा त्याच्या स्टारकास्टची चर्चा नसून, चर्चेचा विषय हा थोडा हटके आहे. अर्थात तो विषय कोणता हा प्रश्नच मुळात उभा राहात नाही. कारण, गोष्टी अगदी स्पष्ट आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोणा आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्याच लग्नाच्या चर्चचा बी- टाऊनच्या कानाकोपऱ्यात सुरु आहेत. 

चाहत्यांमध्ये तर 'दीप-वीर'च्या लग्नाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

१४ आणि १५ नोव्हेंबरला इटलीतील लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी दीपिका आणि रणवीर सहजीवनाची शपथ घेतील. या सोहळ्याला अगदी मोडक्याच पाहुण्यांची उपस्थिती असणार आहे. ज्या कारणास्तव या 'राम-लीला'ने इटलीला रवाना होण्यापूर्वी त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान असणाऱ्या काही खास व्यक्तींची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं. 

इटलीच्या दिशेने निघण्यापूर्वी त्यांनी संजय लीला भन्साळी, शाहरुख खान, करण जोहर, फराह खान यांची भेट घेतली. 

'दीप-वीर'च्या विवाहसोहळ्यात फार कमी पाहुण्यांची उपस्थिती असली तरीही रिसेप्शनमध्ये मात्र कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बंगळुरू आणि मुंबई अशा दोन ठिकाणी या सेलिब्रिटी जोडीच्या लग्नाचा स्वागतसोहळा पार पडणार आहे. त्यांच्या निकटवर्तीयांपैकीच एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार बंगळुरूतील 'द लीला' येथे दीपिकाच्या वतीने स्वागतसोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे. 

 दीपिकाने याच हॉटेलची निवड करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे न्यूयॉर्कमधील Le Cirque किंवा Le Cirque Signature म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इटालियन हॉटेलप्रती असणारं तिचं प्रेम. या हॉटेलच्या बंगळुरूमधील शाखेमुळेच तिने द लीलामध्ये स्वागतसोहळ्याचं आयोजन करण्याचा बेत आखल्याचं कळत आहे. 

२० नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबरपर्यंत दीपिका, रणवीर आणि त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी राहणार असल्याचं कळत आहे. त्यामुळे आता या रिसेप्शन सोहळ्याला कोणकोणत्या चेहऱ्यांची उपस्थिती दिसणार हे पाहणंही तितकच औत्सुक्याचं ठरणार आहे. 

 

Read More