Marathi News> मनोरंजन
Advertisement

Deepika-Ranveer Wedding: दीपिकाच्या मंगळसूत्राची किंमत ऐकली का?

दागिन्यांचा खर्चही अमाप...

Deepika-Ranveer Wedding: दीपिकाच्या मंगळसूत्राची किंमत ऐकली का?

मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे दोघंही सध्या लग्नाच्या तयारीमध्ये व्यग्र असून आता त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवातही झाली आहे. चाहत्यांमध्येही या लग्नसोहळ्याविषयी कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. अशा या बहुप्रतिक्षित विवाहसोहळ्याविषयीची लहानमोठी माहितीही लगेचच मोठ्या चर्चेत रुपांतरित होत आहे. 

'दीप-वीर'च्या लग्नात येणारे पाहुणे म्हणू नका किंवा मग तिचा लग्नातील खास लेहंगा म्हणू नका. लाडक्या जोडीचं लग्न आहे म्हटल्यावर चर्चा तर होणारच असंच वातावरण सध्या कलाविश्वात आणि चाहत्यांच्या वर्तुळात पाहायला मिळत आहे. 

दीपिका तिच्या लग्नात दागिन्यांनाही फार महत्त्व देताना दिसणार आहे. या साऱ्यामध्ये तिने मंगळसूत्रालाही तितकच महत्त्वं दिलं आहे. सोलिटाय़र असणारं एक मंगळसूत्र तिने पसंत केल्याचं कळत आहे. 

सूत्रांचा हवाला देत 'टाईम्स नाऊ'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार तिने पसंत केलेल्या या मंगळसूत्राची किंमत ही २० लाखांच्या घरात आहे. 

लग्नसोहळ्यासाठी दीपिका जवळपास एक कोटी रुपये खर्च करणार असल्याचं कळत आहे. अंधेरीतील एका उच्चभ्रू दागिन्यांच्या दुकानातून तिने हे दागिने खरेदी केल्याचं कळत असून, रणवीरसाठीही सोनसाखळी खरेदी केल्याचं कळत आहे. 

पारंपरिक आणि मॉ़डर्न अशा दोन्ही पद्धतींची सांगड त्यांच्या दागिन्यांमध्ये पाहायला मिळते की आणखी काही नव्या संकल्पनांना दीपिकाने लग्नाच्या दिवसासाठी पसंत केलं आहे हे आता १४ आणि १५ नोव्हेंबरलाच कळणार आहे. 

Read More