Marathi News> मनोरंजन
Advertisement

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये दीपिकाची सरशी

पाहा प्रभाससोबतच्या चित्रपटासाठी तिला नेमकं किती मानधन मिळालं.....   

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये दीपिकाची सरशी

मुंबई : हिंदी कलाविश्वात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये अभिनेत्री Deepika Padukone दीपिका पदुकोण ही अनेकदा अग्रस्थानी असताना दिसते. आपलं हेच स्थान अबाधित ठेवत दीपिकानं पुन्हा एकदा सर्वाधिक मानधनाच्या बाबतीत सरशी साधली आहे. 

येत्या काळात दाक्षिणात्य सुपरस्टार, 'बाहुबली' फेम अभिनेता Prabhas प्रभास याच्यासह दीपिका स्क्रीन शेअर करणारम आहे. नाग अश्विनच्या एका 'साइंन्स फिक्शन' कथानकावर आधारित चित्रपटातून हे दोन्ही आघाडीचे कलाकार एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानं दीपिका तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. तर, प्रभासचा हा २१ वा चित्रपट आहे. 

प्रदर्शनाआधीपासूनच हा चित्रपट सध्या विविध कारणांनी चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातीलच एक विषय म्हणजे यातील स्टार जोडी आणि दुसरा मुद्दा म्हणजे या मध्यवर्ती भूमिकेतील कलाकारांचं मानधन. सहकारी वेबसाईट Wion च्या वृत्तानुसार या चित्रपटासाठी प्रभासनं तब्बल ५० कोटी रुपये इतकं मानधन घेतलं आहे. तर, दीपिकाला या चित्रपटासाठी तब्बल २० कोटी रुपये इतकं मानधन मिळत असल्याची माहिती समोर येत आहे. 

 

संपूर्ण भारतीय चित्रपट विश्वात आतापर्यंत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये दीपिकानं बाजी मारली आहे. दरम्यान, या बहुचर्चित चित्रपटाच्या नावाची माहिती अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. ज्याची निर्मिती तेलुगू चित्रपटसृष्टीतल वैजयंती मूव्हीज या प्रसिद्ध निर्मिती संस्थेकडून करण्यात आली आहे. या चित्रपटासह वैजयंती मूव्हीज ही निर्मिती संस्था त्यांच्या ५० व्या चित्रपटाचा टप्पा ओलांडणार आहे. त्यामुळं सहाजिकत या चित्रपटाकडून अनेकांच्याच फरा अपेक्षा आहेत. अतिशय तगड्या निर्मिती खर्चासह साकारला जाणारा हा चित्रपट विविध भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

 

Read More