Deepika Pakudone In Spirit: 39 वर्षीय अभिनेत्रीने आपल्या प्रसूतीनंतर पुन्हा कामावर परतण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात होते. मात्र, तिच्या पुनरागमनातील महत्त्वाचा प्रोजेक्ट 'स्पिरिट' या चित्रपटातून तिची एक्झिट झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादूकोण आहे.
'स्पिरिट'मधून बाहेर पडल्याचा निर्णय
'स्पिरिट' हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा हे दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटात प्रभास या सुपरस्टारसोबत दीपिकाची जोडी पाहायला मिळणार होती. हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच चर्चेत होता. दीपिका या चित्रपटासाठी तब्बल 20 कोटी रुपये मानधन घेत असल्याची चर्चा होती. ज्यामुळे ती देशातील सर्वात महागडी अभिनेत्री ठरली होती.
वाढत्या मागण्या ठरल्या अडथळा?
मात्र, बॉलिवूड रिपोर्ट्सनुसार, दीपिकाच्या वाढत्या अटी आणि मागण्यांमुळे चित्रपटाचे निर्माते नाराज झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, दीपिकाने दिवसाला केवळ 8 तासांपैकी 6 तासच शूटिंगसाठी उपलब्ध असल्याची अट घातली. त्याशिवाय, तिने फिल्मच्या नफ्यामधील हिस्सा आणि तेलुगू डबिंग न करण्याची अट घातली होती. या मागण्यांनी संदीप रेड्डी वांगा यांच्यावर मोठा दबाव टाकला. आधीच दीपिकाच्या गरोदरपणामुळे चित्रीकरण लांबणीवर गेले होते. या सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्मात्यांनी ती भूमिका दुसऱ्या अभिनेत्रीला देण्याचा निर्णय घेतला.
नव्या अभिनेत्रीचा शोध सुरू
दीपिकाच्या बाहेर पडल्यावर, 'स्पिरिट'च्या निर्मात्यांनी नवीन अभिनेत्रीचा शोध सुरू केला आहे. एक नावाजलेली अभिनेत्री घेण्याचे संकेत दिले गेले असून, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील काही मोठ्या नावांचा विचार सुरू आहे. यात रश्मिका मंदाना, नयनतारा आणि कीर्ती सुरेश यांची नावे पुढे येत आहेत. मात्र अद्याप यावर कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 'स्पिरिट'ची स्टोरी प्रेक्षकांच्या मनात आधीच उत्सुकता निर्माण करत आहे. त्यामुळे ही मुख्य भूमिका कोण साकारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा: नव्या कलाकारांसह परत येत आहे 'स्ट्रेंजर थिंग्ज'चा शेवटचा सीझन; 2025 मध्ये होणार भव्य प्रीमियर!
दीपिकाची संपत्ती आणि करिअर अपडेट
दीपिका पदुकोण बॉलिवूडमधील सर्वाधिक यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिची एकूण संपत्ती 500 कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे. 'पठाण', 'जवान', 'पिकू', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावती' यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये तिने दमदार कामगिरी केली आहे.
दीपिका शेवटची 'सिंघम अगेन' या रोहित शेट्टीच्या बिग-बजेट चित्रपटात दिसली होती. यात तिची भूमिका एका पोलिस अधिकाऱ्याची होती