Marathi News> मनोरंजन
Advertisement

लग्नाआधी पती नव्हे, 'या' व्यक्तीसोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये होत्या बॉलिवूड सेलिब्रिटी

नाती जितक्या वेगानं आकारास येतात तितक्याच वेगानं या नात्यांत दुरावाही येतो

लग्नाआधी पती नव्हे, 'या' व्यक्तीसोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये होत्या बॉलिवूड सेलिब्रिटी

मुंबई : कलाकार मंडळी दर दिवशी बहुविध कारणांमुळे चर्चेत असतात. मुख्य म्हणजे या कलाकारांच्या खासगी आयुष्याबाबत प्रेक्षकांमध्ये कायमच कुतूहल पाहायला मिळतं. त्याची चर्चाही होते. बी टाऊनमध्य़े सेलिब्रिटींची नाती जितक्या वेगानं आकारास येतात तितक्याच वेगानं या नात्यांत दुरावाही येतो. अशाच काही सेलिब्रिटींसोबतही घडलं. 

एक वेळ अशीही आली, जेव्हा प्रेम करत असणाऱ्या व्यक्तीसोबत बॉलिवूड सेलिब्रिटी लिव्हइन रिलेशनशिपमध्ये होत्या. ऐश्वर्या रायपासून प्रियांका चोप्रापर्यंतच्या नावाचा यात समावेश आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार एकेकाळी सलमान खान आणि ऐश्वर्या राय लिव्हइन रिलेशनशिपमध्ये होते. यानंतर ऐश्वर्याचं लग्न अभिनेता अभिषेक बच्चन याच्याशी झालं होतं. 

fallbacks

प्रेक्षकांची पसंती मिळालेली एक जोडी म्हणजे बिपाशा बासू आणि जॉन अब्राहम. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर, लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ही जोडी वेगळी झालेली. 

fallbacks

सूत्रांच्या माहितीनुसार प्रियांका चोप्राच्या घरी इनकम टॅक्सची धाड पडली होती, तेव्हा दार शाहिद कपूरनं उघडलं होतं. ज्यावरून त्यांच्या लिव्हइनवर शिक्कामोर्तब झालेलं. 

fallbacks

हिमांश कोहली आणि नेहा कक्करसुद्धा लिव्हइनमध्ये होते. पण, पुढे जाऊन मात्र हे नातं तुटलं. 

fallbacks

वैवाहिक नात्यात अडकण्यापूर्वी लारा दत्ता केली दोरजीसह रिलेशनशिपमध्ये होती. काही वर्षे ही दोघं लिव्हइनमध्ये होती. 

fallbacks

बराच काळ नात्यात आणि काही प्रसंगी लिव्हइनममध्ये राहणाऱ्या करीना आणि शाहिदच्या नात्यातही फार आधीच दुरावा आला. 

fallbacks

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणबीर कपूर यांचं नातं बी- टाऊनमध्ये चर्चेचा विषय होतं. पण, काही काळानंतरच या जोडीमध्ये दुरावा आला होता. 

fallbacks

Read More