Marathi News> मनोरंजन
Advertisement

Ex boyfriend विषयी दीपिका म्हणते, तो....

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी नोव्हेंबर महिन्यात लग्नगाठ बांधत त्यांच्या नात्याला एक नवं वळण दिलं. ज्यानंतर... 

Ex boyfriend विषयी दीपिका म्हणते, तो....

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी नोव्हेंबर महिन्यात लग्नगाठ बांधत त्यांच्या नात्याला एक नवं वळण दिलं. इटलीतील लेक कोमो येथे  त्यांचा विवाहसोहळा पार पडला. फक्त कुटुंबीय आणि अगदी खास मित्रपरिवारानेच या सोहळ्याला हजेरी लावली होती. 

इटलीतून परतल्यानंतर दीपिका आणि रणवीरने जवळपास ४ स्वागसोहळ्यांचं आयोजन करत सर्व मंडळींना, मित्रांना बोलावणं पाठवलं. यामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलं ते म्हणजे या जोडीचं मुंबईतील रिसेप्शन. संपूर्ण कलाविश्वाने 'दीप-वीर'ला शुभेच्छा देण्यासाठी या सोहळ्याला हजेरी लावली. पण, कलाकरांच्या या गर्दीत दीपिकाचा पूर्वाश्रमीचा प्रियकर म्हणजेच तिचा Ex boyfriend रणबीर कपूर मात्र कुठेच दिसला नाही. 

आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाचं कारण देत तो अनुपस्थित असल्याच्या चर्चाही झाल्या. याचविषयी देव्हा दीपिकाला विचारण्यात आलं तेव्हा तिनेही रणबीरसोबतच्या नात्याविषयी वक्तव्य करत तो स्वागतसोहळ्याचा न आल्याविषयी आपली प्रतिक्रिया दिली. 

'फेमसली फिल्मफेअर' या चॅट शोमध्ये दीपिकाने तिची प्रतिक्रिया दिल्याचं वृत्त समोर येत आहे. 'आम्ही त्याविषयी फार बोललोच नाही. म्हणजे रिसेप्शनआधी आमचं बोलणं झालं होतं. पण, त्यानंतर काहीच बोलणं नाही', असं म्हणत रणबीर अगदी तसाच आहे, त्यामुळे त्याच्या अशा वागण्याचं आपल्याला काहीच आश्चर्य वाटत नसल्याचं तिने स्पष्ट केलं. 

रणबीरसोबतच्या आपल्या नात्याची हीच सुंदर बाजू आहे. कोणतीही गोष्ट न व्यक्त करताही खूप काही व्यक्त होतं, असं म्हणत तिने नात्यात असणारी मैत्री यावेळी अधोरेखित केली. रणबीर आणि दीपिका त्यांच्या कारकिर्दीतील अगदी सुरुवातीच्या काळापासून एकमेकांना डेट करत होते. पण, वेळेसोबतच त्यांचं हे नातंही बदललं. आजच्या घडीला त्यांच्या नात्यात कायमचा दुरावा आला असला तरीही सहकलाकार आणि एकमेकांचे मित्र म्हणून ते नेहमीच एकमेकांसोबत असल्याचच पाहायला मिळालं आहे. 

 

Read More