Marathi News> मनोरंजन
Advertisement

आदित्य- दिशाच्या केमिस्ट्रीचीच सोशल मीडियावर हवा

चर्चा तर होणारच... 

आदित्य- दिशाच्या केमिस्ट्रीचीच सोशल मीडियावर हवा

मुंबई : सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक नाव घ्यायचं झाल्यास अभिनेत्री दिशा पटनी हिच्या नावाचा त्यात सहज समावेश होतो. एखादा फोटो पोस्ट करणं असो किंवा आगामी चित्रपटाची घोषणा करणं असो. दिशा कायमच बहुविध रुपांमध्ये सर्वांसमोर आली आहे. बॉलिवूडमधील या लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळातही चर्चेत आलं आहे. 

राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबतची तिची मैत्री बऱ्याच चर्चांना वाव देत आहे. यातच काही दिवसांपूर्वी झालेल्या प्रश्नोत्तरांच्या एका रंजक सत्रामध्ये लग्नाच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांचं उत्तर पाहता या साऱ्याची 'दिशा' चर्चांच्याच रुपात समोर आली. 

वाचा : लग्नाच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणतात, तुमची 'दिशा' चुकली

आता दिशा पटनी पुन्हा लक्ष वेधत आहे ते म्हणजे तिच्या आणि आदित्यच्या केमिस्ट्रीमुळे. तिची ही केमिस्ट्री आदित्य ठाकरे यांच्यासोबतची नसून, आगामी चित्रपटातील सहकलाकार आदित्य रॉय कपूर याच्यासोबतची आहे. नुकतंच दिशाने 'मलंग' या चित्रपटातील एक पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. ज्यामध्ये आदित्यसोबतची तिची ऑनस्क्रीन केमिस्ट्री सध्या प्रकाशझोतात आली आहे. 

डेनिम शॉर्ट्समध्ये दिशाचा लूक आकर्षक आहे. मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटातून अनिल कपूर, कुणाल खेमू, एली अवरामसुद्धा झळकणार आहेत. लव्ह रंजन, अंकुर गर्ग, भुषण कुमार, क्रिष्ण कुमार आणि जय शेवाक्रमण यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

Read More