Marathi News> मनोरंजन
Advertisement

दिशा पटनीच्या बॉडीगार्डची फोटोग्राफरशी बाचाबाची; व्हिडिओ व्हायरल

दिशासुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होती.... 

दिशा पटनीच्या बॉडीगार्डची फोटोग्राफरशी बाचाबाची; व्हिडिओ व्हायरल

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटींची लोकप्रियता पाहता या कलाकारांची एक झलक टीपण्यासाठी छायाचित्रकारांमध्येही स्पर्धा पाहायला मिळते. पण, सेलिब्रिटींचे फोटो टीपण्यासाठी बरेच प्रयत्न करणाऱ्या याच छायाचित्रकारांना अडचणींच्या परिस्थितीचाही सामना करावा लागतो. अभिनेत्री दिशा पटनी हिची एक झलक टीपतेवेळ हा सारा प्रकार घडल्याचं पाहायला मिळालं. 

रविवारी रात्री हा सर्व प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे. ज्यामध्ये दिशाच्या बॉडीगार्डची एका छायाचित्रकारासोबत शाब्दिक बाचाबाची झाली. यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावरही शेअर करण्यात आला. दिशा कारमध्ये जात असतानाच छायाचित्रकारांनी फोटोसाठी तिला थांबण्यास सांगितलं. तिचे फोटो टीपण्य़ासाठी म्हणून गर्दी करणाऱ्या छायाचित्रकारांना बॉडीगार्डने हटकलं. तेव्हात संतप्त छायाचित्रकार आणि दिशाच्या बॉडीगार्डमध्ये खटका उडाला. 

एका फोटोमुळे झालेल्या या वादानंतर दिशाच्या मॅनेजरने येत झाल्या प्रकरणी माफी मागितली आणि प्रसंग निभावून नेण्याचा प्रयत्न केलं. सोशल मीडियावर या प्रसंगाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. ज्याला असंख्य लाईक्स मिळाले असून, त्या व्हि़डिओवर अनेकांनी आपली प्रतिक्रियाही दिली आहे. 

माध्यमांच्या प्रतिनिधींशी कलाकारांचं किंवा कोणत्याही क्षेत्रातील सेलिब्रिटींचं नातं तरं खास. पण, अशा काही प्रसंगांमुळे याच नात्यांमध्ये मीठाचा खडा पडतो. तेव्हा आता झाल्या प्रकरावर दिशा काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

वाचा : मराठमोळ्या श्रिया पिळगावकरची दाक्षिणात्य अभिनेत्याला भुरळ

आपल्या व्यग्र दिनचर्येमध्ये रुळणारी दिशा काही दिवसांपूर्वीच 'मलंग' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांच्यासह तिने या चित्रपटाच्या निमित्ताने स्क्रीन शेअर केली होती. येत्या काळात ती 'राधे' या चित्रपटातून झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

 

Read More