Marathi News> मनोरंजन
Advertisement

भलते सल्ले देऊ नका...; सर्वांसमोरच वडिलांवर भडकली जान्हवी कपूर

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे...   

भलते सल्ले देऊ नका...; सर्वांसमोरच वडिलांवर भडकली जान्हवी कपूर

मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर कायम तिच्या वडिलांची काळजी घेताना दिसते. पण, यावेळी मात्र जान्हवी सर्वामसमोरच वडिलांवर भडकल्याचं पाहायला मिळत आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींसमोरच जान्हवीचा तिच्या वडिलांवर राग अनावर झाला आणि तिनं त्यांना तिथेच अडवलं. नेमकं असं झालंच का, हाच प्रश्न तुम्हालाही पडतोय ना? 

तर, वडिलांसोबत मैत्रीचंच नातं जपणारी जान्हवी कायमच त्यांची काळजी करताना दिसते. अशातच कोविड काळात ती जरा जास्तच चिंतेत असते. वडिलांच्या आरोग्याची काळजी घेत असतानाच त्यांच्याकडून कुठं अनावधानानं चूक झाल्यास जान्हवी नेमकी काय करते, याचीच प्रतिची यावेळी आली. 

एअरपोर्टमधून बाहेर पडत असतानात छायाचित्रकारांच्या घोळक्याने जान्हवी आणि तिचे वडील दिग्दर्शक- निर्माते बोनी कपूर यांना अडवलं. त्यावेळी छायाचित्रकारांनी बोनी कपूर यांना मास्क काढण्याची विनंती केली. 

ते मास्क काढत असतानाच जान्हवीनं त्यांना स्पष्च नकार देत असं काही न करण्याचं दरडावून सांगितलं. काही होणार नाही, असं म्हणणाऱ्या छायाचित्रकारांनाही तिनं तुम्ही यांना नको ते सल्ले देऊ नका अशा शब्दांत सुनावलं. 

एका क्षणाला काहीशी चिडलेली जान्हवी क्षणार्धातच पुन्हा शांत झाली आणि तिनं छायाचित्रकारांना फोटो घेऊ दिला. यानंतर त्यांच्याशी संवाद साधत ती तेथून निघून गेली. 

Read More