Marathi News> मनोरंजन
Advertisement

OMG! लाखामोलाचे शूज घालणाऱ्या जान्हवीला नेटकरी म्हणतात...

रंगीबेरंगी शूजची किंमत कितीही असली तरीही चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना मात्र ते काही रुचले नाहीत 

OMG! लाखामोलाचे शूज घालणाऱ्या जान्हवीला नेटकरी म्हणतात...

मुंबई: हिंदी कलाविश्वात सध्याच्या घडीला नवोदित कलाकारांची बरीच चर्चा होताना दिसत आहेत. अशाच कलाकारांमध्ये प्रकाशझोतात आहे ती म्हणजे अभिनेत्री जान्हवी कपूर. ‘धडक’ या चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर जान्हवीने तिच्या आगामी प्रोजेक्ट्सकडेही लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यासोबतच विविध ठिकाणी ती मोठ्या आत्मविश्वासाने वावरु लागली. अशावेळी जान्हवीच्या फॅशन सेन्सची अनेकांनी दाद दिली.

कोणत्याही कार्यक्रमाला गेलं असता तिच्यावर कोणाच्या नजरा खिळल्या नाहीत तर आश्चर्यच.

जान्हवीचा एअरपोर्ट लूक असो किंवा मग एखाद्या पुरस्कार सोहळ्यासाठी तिने निवडलेला एखादा लूक असो. ती येते आणि सर्वांची मनं जिंकते हेच खरं. पण, यालाही काही आपवाद आहेत.

fallbacks

काही दिवसांपूर्वीच जान्हवीला तिच्या बहिणीसोबत म्हणजेच खुशी कपूर हिच्यासोबत विमानतळावर पाहिलं गेलं. त्यानंतर जान्हवी सोशल मीडिया ट्रोलिंगचा शिकार झाली.

यामागचं कारण ठरलं ते म्हणजे तिचे शूज. Gucci या ब्रँडचे जान्हवीचे शूज तब्बल १.२ लाख रुपयांचे असल्याचं कळत आहे. रंगीबेरंगी शूजची किंमत कितीही असली तरीही चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना मात्र ते काही रुचले नसल्याचच त्यांच्या कमेंट पाहून स्पष्ट होत आहे.

fallbacks

अनेकांनी तर तिच्या फॅशन सेन्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यावरुनही तिची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली.

सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार आणि चाहत्यांमध्ये असणारी दरी कमी झाली आहे हे खरं. पण, सेलिब्रिटी मंडळींना बऱ्याचदा नेकऱ्यांकडून होणाऱ्या उपरोधिक टीकांचा वारंवार सामना करावा लागत असल्याचंही अनेकदा पाहायला मिळतं.

Read More