Marathi News> मनोरंजन
Advertisement

लग्न होऊनही अभिनेत्री पत्नी- मातृत्त्वाच्या सुखापासून दूर; इतकं वाईट तर शत्रूसोबतही होऊ नये

पाहा कोण होती ही इतकी दु:ख झेलणारी अभिनेत्री 

लग्न होऊनही अभिनेत्री पत्नी- मातृत्त्वाच्या सुखापासून दूर; इतकं वाईट तर शत्रूसोबतही होऊ नये

मुंबई : जीवनात अनेकदा काही असे प्रसंग आपल्यासमोर उभे ठाकतात जेव्हा सगळं असूनही आपण नेमके कुठेतरी अडखळतो का, असंच वाटू लागतं. हिंदी चित्रपट विश्वात एक काळ गाजवणाऱ्या एका अतिशय लोकप्रिय अभिनेत्रीसोबतही असंच घडलं. सध्या ही अभिनेत्री राजकीय वर्तुळ गाजवत असली, तरीही जीवनात आलेले आव्हानात्मक प्रसंग तिलाही चुकले नाहीत.

80 च्या दशकात सुपरहिट चित्रपटांतून चाहत्यांच्या मनाचा ठाव घेणारी ही अभिनेत्री म्हणजे जया प्रदा.    या  अभिनेत्रीचा  आतापर्यंतचा प्रवास सोपा वाटत असला  तरीही तो तितका सोपा नव्हता.

श्रीदेवी, शर्मिला टागोर, परवीन बाबी, झिनत अमान यांसारख्या अभिनेत्रींची तिला स्पर्धा होती. पुढे विवाहित पुरुषाशी लग्न केल्यामुळं जया प्रदा यांना कधीच पत्नी आणि मातृत्त्वाचं सुख अनुभवता आलं नाही.

चित्रपट निर्माते श्रीकांत नहाटा यांच्याशी जया प्रदा यांनी 1986  मध्ये लग्न केलं आणि  त्यांच्याभेवती प्रसिद्धीऐवजी आता वादाच्या वलयानं वेढा घातला.

नहाटा यांना पहिल्या लग्नातून मुलं होती. त्यातही त्यांनी पहिल्या पत्नीकडून घटस्फोट घेतला नव्हता. ज्यामुळं जया प्रदा यांना कधीच आई होण्याचं सुख मिळालं नाही.

fallbacks

जया प्रदा यांना स्वत:चं मूल हवं होतं. पण, नहाटा यांची अशी इच्छा नव्हती. अखेर या नात्यात दुरावा आला.  

 

Read More