Marathi News> मनोरंजन
Advertisement

Here we go! अभिनेत्री काजल अग्रवाल विवाहबंधनात, पहिला फोटो आला समोर

अभिनेत्री काजोल अग्रवालचा लग्नाचा पहिला फोटो व्हायरल होत आहे.

Here we go! अभिनेत्री काजल अग्रवाल विवाहबंधनात, पहिला फोटो आला समोर

मुंबई : हिंदी आणि दाक्षिणात्या चित्रपटांमध्ये आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या अभिनेत्री काजल अग्रवाल हिच्या विवाहसोहळ्यातील पहिला फोटो अखेर समोर आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा फोटो समोर आला आहे. ज्यामुळं चाहत्यांचा आनंद शिगेला पोहोचला आहे.

इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोमध्ये काजल सुरेख अशा लेहंग्यामध्ये दिसत आहे. तर, तिचा पतीसुद्धा शेरवानीमध्ये रुबाबदार दिसत आहे. लाल, गुलाबी, सोनेरी अशा रंगाना प्राधान्य देत काजल आणि गौतम किचलू यांचा वेडिंग लूक परिपूर्ण करण्यात आला होता. याला जोड मिळाली ती म्हणजे दागिन्यांची आणि अर्थातच अद्वितीय आनंदाची.

विवाहबंधनात अडकलेल्या काजल आणि गौतमच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंदही पाहायला मिळाला. काही दिवसांपूर्वीच काजलनं तिच्या खासगी आयुष्याबाबतची महत्त्वाची बातमी शेअर करत ती विवाहबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासूनच तिच्या लग्नाबाबत चाहत्यांमध्ये कुतूहल पाहायला मिळालं होतं.

Read More