Marathi News> मनोरंजन
Advertisement

उफ्फ तेरी अदा; Kangana Ranaut नं बाथटबमधला टॉपलेस फोटो शेअर करताच...

ट्विटवरची टीवटीव कमी झाल्यानंतर आता कंगना इन्स्टाग्रामवर बरीच सक्रिय झाली आहे.

उफ्फ तेरी अदा; Kangana Ranaut नं बाथटबमधला टॉपलेस फोटो शेअर करताच...

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्याच्या घडीला दोन गट आहेत. कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) नजरेतून पाहायचं झाल्यात ती एका बाजुला आणि इतर सेलिब्रिटी दुसऱ्या बाजूला असे हे गट. कायमच कंगना बहुविध विषयांवर आपल्या ठाम भूमिका मांडत असते. तिचा स्पष्टवक्तेपणा कधीकधी अनेकांच्या मनात तिच्याविरोधात रोषही निर्माण करणारा ठरतो. खुद्द कंगनालाही याची किंमत फेडावी लागली होती, कारण तिचं ट्विट अकाऊंट सस्पेंड करण्याची कारवाई झाली होती. 

ट्विटवरची टीवटीव कमी झाल्यानंतर आता कंगना इन्स्टाग्रामवर बरीच सक्रिय झाली आहे. इथे ती अनेक पोस्ट शेअर करत असते. सध्या तिनं आगामी 'धाकड' या चित्रपटाच्या सेटवरील चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवसाचे काही क्षण सर्वांच्या भेटीला आणले. 

कंगनानं यासंदर्भातील व्हिडीओ शेअर केले. ज्यानंतर तिनं एक फोटोही शेअर केला. हा फोटो शेअर होताच इंटरनेटवर चाहत्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. या फोटोमध्ये कंगना टॉपलेस एका बाथटबमध्ये निवांत पडून असल्याचं दिसत आहे. तिच्या जवळच मागच्या बाजुला असणाऱ्या एका टेबलवर मद्याची बाटली आहे. चित्रीकरणानंतरचे निवांत क्षण... अशा आशयाचं कॅप्शन तिनं या फोटोवर लिहिलं आहे. तिचा हा बोल्ड अंदाज भलताच व्हायरल होत आहे.

fallbacks

दरम्यान, 'धाकड' व्यतिरिक्त कंगना सध्या बऱ्याच प्रोजेक्टमध्ये व्यग्र आहे. काही चित्रपटांचं चित्रीकरण तिनं पूर्ण केलं असून काहींच्या चित्रीकरणाला ती वेळ देत आहे. 'थलैवी', 'मणिकर्णिका रिटर्न्‍स द लीजेंड ऑफ दिद्दा' आणि 'तेजस' अशा चित्रपटांतून ती झळकणार आहे. 

Read More