Marathi News> मनोरंजन
Advertisement

आता कुठे गेले संस्कार? बोल्ड फोटो शेअर करणाऱ्या कंगनाला ट्रोलर्सनी सुनावलं

या ताई देशात येताच धर्म, सभ्यतेविषयीचं ज्ञान देणार, आणि परदेशी जाताच....   

आता कुठे गेले संस्कार? बोल्ड फोटो शेअर करणाऱ्या कंगनाला ट्रोलर्सनी सुनावलं

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत चर्चेत असणं आता काही नवं नाही. कंगनानं केलेलं वक्तव्य, तिचे फोटो, व्हिडीओ कायमच नेटिझन्सचं लक्ष वेधतात. यावेळी कंगना नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. याला निमित्त आहे ते म्हणजे तिचा बोल्ड अंदाज. 

'धाकड' चित्रपटामुळं कंगना सध्या बरीच व्यग्र असल्याचं दिसत होतं. पण, आता मात्र चित्रीकरणातून वेळ मिळाल्यानंतर तिनं स्वत:लाही वेळ देण्यास सुरुवात केली आहे. पण, असं करणं कंगनाला महागात पडल्याचं कळत आहे. 

ट्रांसपरंट ब्रालेट घालून कंगनानं एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. यामध्ये तिनं पांढऱ्या रंगाच्या लूकवर सोन्याच्या काही दागिन्यांची जोड दिली आहे. केसांचा एक आंबाडा उंचावर बाधून तिनं मिनिमल मेकअप ठेवत हा लूक परिपूर्ण केला आहे. 

कंगनाचा हा लूक स्टाईलच्या हिशोबानं कितीही ऑन पॉईंट असला, तरीही सोशल मीडिया युजर्सना मात्र ही बाब पटली नाही. या फोटोवरून ती संस्कार विसरली असल्याचं म्हणत अनेकांनीच शाब्दिक चपराक मारली, तर कोणी तिच्या सभ्यतेवरही प्रश्न उपस्थित केला. 

fallbacks

दरम्यान, 'धाकड' व्यतिरिक्त कंगना सध्या येत्या काळात अनेक चित्रपटांतून झळकतील. बऱ्याच प्रोजेक्टमध्ये ती वेळ देत आहे. 'थलैवी', 'मणिकर्णिका रिटर्न्‍स द लीजेंड ऑफ दिद्दा' आणि 'तेजस' अशा चित्रपटांतून ती झळकणार आहे. 

Read More