Marathi News> मनोरंजन
Advertisement

कपूर कुटुंबात लगीनघाई; पार पडला अभिनेत्याचा रोका

पाहा कोणासाठी एकत्र आलं संपूर्ण कपूर कुटुंब.... 

कपूर कुटुंबात लगीनघाई; पार पडला अभिनेत्याचा रोका

मुंबई : हिंदी कलाविश्वात अतिशय मानाच्या अशा कुटुंबांपैकी एक असणाऱ्या कपूर कुटुंबाने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यावेळी निमित्त आहे ते म्हणजे या कुटुंबात सुरु असणाऱ्या लगीनघाईमुळे. कपूर कुटुंबात कोणाचं लग्न.....? असाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? आलिया आणि रणबीरचं नाव तुमच्या लक्षात येत असेल तर तसं नाहीये. कारण, ही लगीनगाई आलिया- रणबीरची नव्हे, तर ही लगीनघाई आहे करिना आणि रणबीरच्या आतेभावाची म्हणजेच अभिनेता अरमान जैन याची. 

नुकताच अरमान आणि त्याची प्रेयसी अनीसा मल्होत्रा याचा रोका पार पडला. यावेळी कपूर कुटुंबीयांसोबतच काही सेलिब्रिटी मंडळींचीही उपस्थिती पाहायला मिळाली. मुंबईत पार पडलेल्या या सोहळ्याच छायाचित्रकारांपासून उपस्थितांपर्यंत सर्वांच्याच नजरा खिळल्या त्या म्हणजे करिना कपूर खान आणि तिचा पती सैफ अली खान या सेलिब्रिटी जोडीवर. यावेळी करिना लाल रंगाच्या सुरेख ड्रेसमध्ये आली होती, तर सैफही त्याच्या नेहमीच्याच रुबाबदार लूकमध्ये पाहायला मिळाला. 

अरमान आणि  अनीसाच्या रोका समारंभासाठी अभिनेत्री आणि अरमानची बहिण करिष्मा कपूरही पोहोचली होती. यावेळी तिची दोन्ही मुलं आणि आई, ज्येष्ठ अभिनेत्री बबिता कपूरही हजर होत्या. ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर आणि त्यांची पत्नी नीतू कपूर यांनीही यावेळी या कौटुंबीक सोहळ्याला उपस्थिती लावली होती. 

फक्त कपूर कुटुंबीयच नव्हे, तर श्वेता बच्च, तारा सुतारिया, किआरा अडवाणी यांनीही या समारंभाला उपस्थिती राहत कपूर कुटुंबीयांच्या आनंदाच्या क्षणांत त्या सहभागी झाल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तारा सुतारिया ही आदर जैन याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे तिची या सोहळ्याची उपस्थितीसुद्धा चर्चेत राहिली. 

Read More