Marathi News> मनोरंजन
Advertisement

Video : 'कॅमेराच तोडेन...'; करिनामुळे कोणावर संतापला सैफ? त्याचं हे रुप कधीच पाहिलं नसेल

एक वेळ अशीही आली होती जेव्हा सैफचा संताप अनावर झाल्यामुळं त्याची जीभ घसरली होती

Video : 'कॅमेराच तोडेन...'; करिनामुळे कोणावर संतापला सैफ?  त्याचं हे रुप कधीच पाहिलं नसेल

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर खान ही जोजी बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय कपल म्हणूनही प्रसिद्ध आहे. शाही जोडपं, म्हणूनही सैफिनाकडे पाहिलं जातं. त्यांची एक झलक टीपण्यासाठी कधीकधी तर चाहते आणि माध्यमांच्या प्रतिनिधींचा एकच गोंधळ उडतो. (Bollywood news )

सैफ आणि करिनासुद्धा फोटो काढणाऱ्यांसाठी अतिशय समंजसपणे आणि तितक्याच आनंदात पोझ देतानाही दिसतात. पण, एक वेळ अशीही आली होती जेव्हा सैफचा संताप अनावर झाल्यामुळं त्याची जीभ घसरली होती. (kareena kapoor khan saif ali khan )

तो प्रसंग करिना आणि सैफच्या लग्नाआधीचा आहे. ज्यावेळी या दोघांनीही त्यांचं हे नातं गुलदस्त्यात ठेवलं होतं. एके दिवशी ती दोघं डिनरसाठी म्हणून बाहेर गेली असता माध्यमांच्या प्रतिनीधींची नजर त्यांच्यावर पडली. पुढे जे झालं, त्याचा अनुभव एका छायाचित्रकाराने व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांशी शेअर केला. 

'आम्हाला माहिती मिळाली, की सैउ आणि करिना वांद्र्यातील कोणत्यातरी रेस्टराँमध्ये डिनरसाठी पोहोचले आहेत. तिथे बाहेरच सुरक्षेचे चोख बंदोबस्त होते. थोड्याच वेळानं दोघं बाहेर आले आणि तेव्हाच त्यांचे फोटो काढण्यास अनेकांनीच सुरुवात केली', असं च्या छायाचित्रकारांनी व्हिडीओदरम्यान सांगितलं. 

फोटो नका काढू... असं म्हणत करिनानं नाराजी व्यक्त केली. तेव्हा सैफचा चेहराही पाहण्याजोगा झाला होता. ते दोघं तेव्हाच पुन्हा हॉटेलमध्ये गेले... पण ते कधीतरी बाहरे येतील... अशाच आशेवर छायाचित्रकार हॉटेलबाहेर उभे राहिले. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sudarshan (@notwhyral)

सैफ तेव्हाच संतापला आणि म्हणाला, 'आता फोटो काढलात, पण आता परत जर असं केलं तर मारेन मी तुम्हाला, कॅमेराच तोडेन तुमचा'

करिना एकाएकी बावचळल्यामुळे सैफचाही पारा चढला होता. मनाविरुद्ध हे नातं सर्वांसमोर आणू देण्यासाठीच प्रयत्नशील असताना सैफ आणि करिनाचं वेगळंच रुप सर्वांनी पाहिलं. हा किस्सा जुना असला, तरीही त्याची चर्चा मात्र विषय निघताच सुरु होते हे खरं. 

Read More