Marathi News> मनोरंजन
Advertisement

करिनाने सांगितली सैफची वाईट सवय

ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल 

करिनाने सांगितली सैफची वाईट सवय

मुंबई : हिंदी कलाविश्वात 'बेगम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि शिवाय 'मै अपनी फेव्हरेट हूँ' या डायलॉगमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या अभिनेत्री करिना कपूर खान हिने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. सैफने करिनासाठी एका सुरेख पार्टीचंही आयोजन केलं होतं. तेव्हापासून ही शाही जोडी सर्वांचं लक्ष वेधत आहे. त्यातच आता करिनाने चक्क सैफविषयीची अशी माहिती समोर आणली आहे, जी ऐकून तुम्हालाही हसूच येईल. 

एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर करिनाने सैफच्या एका अशा सवयीविषयी सांगितलं जी तिलाही काहीशी खटकते. 'डीएनए'च्या वृत्तानुसार, करिनाने सांगितलेली सैफची वाईट सवय म्हणजे, कोणत्याही गोष्टीला सर्वप्रथम नकार देण्याची. 

''कोणत्याही गोष्टीला त्याची पहिली प्रतिक्रिया ही 'नाही', अशीच असते. सैफ आता तुला काय करायचं आहे, आपण बाहेर जाऊया का? त्यावर त्याचं उत्तर असतं, 'नाही'. पुढे तीन एक तासाने तो फोन करुन नकार दिलेल्या गोष्टीसाठी होकार देतो. मग तेव्हा माझं असं होतं, की हीच गोष्ट मी आधी विचारली तेव्हा तू यासाठी नकार का देतोस?, आता तो हे 'नाही' सहज म्हणतो असंच वाटतं', हे करिनाने स्पष्ट केलं. 

करिअरसोबतच कुटुंबाला प्राधान्य देणाऱ्या करिनाने या कार्यक्रमादरम्य़ान, तिच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टीही उघड केल्या. ज्यामध्ये तिने सैफसोबतचा मोकळा वेळ आपण तैमुरसोबत व्यतीत करत असल्याचं सांगितलं. करिना आणि सैफ हे निवडक सेलिब्रिटींमध्येच वावरताना दिसतात, याचं स्पष्टीकरण तिच्या एका वक्तव्यातून झालं. कलाविश्वात काही सेलिब्रिटी कुटुंबातील मंडळी वगळता आपले फारसे मित्रमंडळी नसल्याचं तिने सांगितलं. शिवाय सैफला आणि मला चित्रपट वर्तुळांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या पार्टीला वगैरे जाणं फारसं आवडत नसल्याचा खुलासाही तिने केला. 

Read More