Marathi News> मनोरंजन
Advertisement

इज्जत है, दौलत है, शोहरत है.... तरीही करिनाची मोठी नणंद वयाच्या 46 व्या वर्षी अविवाहित का?

कौटुंबीक जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या बाबतीतही ती मागेपुढे बघत नाही.  

इज्जत है, दौलत है, शोहरत है.... तरीही करिनाची मोठी नणंद वयाच्या 46 व्या वर्षी अविवाहित का?

Kareena Kapoor Khan Gifts For Saba Pataudi: अभिनेत्री करिना कपूर खान हिनं कायमच तिच्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. फक्त कामाच्याच बाबतीतच नाही, तर खासगी आयुष्यामुळंही करिना कायमच चर्चेत असते. फक्त चित्रपटांच्या बाबतीच नव्हे, तर कौटुंबीक जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या बाबतीतही ती मागेपुढे बघत नाही.

करिना कायमच तिच्या कौटुंबीक कार्यक्रमांमध्ये कुटुंबीयांच्या सोबतीनं कल्ला करताना दिसते. माहेरचं कपूर कुटुंब आणि सासरचं पतौडी कुटुंब या दोघांमध्येही ती योग्य तो समतोल राखताना दिसते. 

करिनाच्या कुटुंबाकडे पाहिलं की, अरे किती छान आणि आनंदी कुटुंब आहे हे.... अशीच प्रतिक्रिया पाहणारे देतात. पण, तिच्या याच कुटुंबात एक अशीही व्यक्ती आहे जिनं वयाच्या 46 व्या वर्षीही लग्न केलेलं नाही. 

ही व्यक्ती म्हणजे करिनाची मोठी नणंद सबा पतौडी. सबाच्या वाढदिवसानिमित्त करिना आणि सैफनं तिच्यासाठी केक, शुभेच्छा आणि काही भेटवस्तू पाठवल्या. ज्याचे फोटो खुद्द करिनानं सोशल मीडियावर शेअर केले. 

एकिकडे कुटुंबात प्रत्येकजण आपआपल्या जवळच्या व्यक्तींसोबतच जगण्याचा आनंद घेत असताना दुसरीकडे सबा मात्र एकट्यानंच आयुष्य जगत आहे. 

fallbacks

सबा एक ज्वेलरी डिझायनर आहे. 2011 मध्य़े वडील मन्सूर अली पतौडी यांच्या निधनानंतर तिचं नाव भोपाळच्या शाही कुटुंबाच्या कोष रक्षकाच्या रुपात पुढे करण्यात आलं. दरम्यानच्या काळात सबानं लग्नापासून दुरावा पत्करला. तिनं असा निर्णय का घेतला याचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. 

fallbacks

औकाफ-ए-शाही ट्रस्टचा ती मुतवल्लीच्या रुपात भोपाळ आणि सौदी अरबमध्ये असणाऱ्या संपत्तीची देखरेख करते. संस्थान पद्धतीला देशात पूर्णविराम मिळाल्यानंतर औकाफ-ए-शाहीच्या प्रमुखपदी येणारी ती देशातील पहिली महिला ठरली आहे. 

Read More