Marathi News> मनोरंजन
Advertisement

करीनामुळे कपूर कुटुंबातील 'या' व्यक्तीच्या घराचे फोटो पहिल्यांदाच समोर

पाहा कसं आहे त्यांचं आलिशान घर... 

करीनामुळे कपूर कुटुंबातील 'या' व्यक्तीच्या घराचे फोटो पहिल्यांदाच समोर

मुंबई : हिंदी चित्रपट विश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या घरांचे फोटो आतापर्यंत चाहत्यांना पाहता आले आहेत. अनेकदा तर, खुद्द सेलिब्रिटींनीच त्यांच्या घरांची झलक सर्वांच्या भेटीला आणली. पण, काही सेलिब्रिटी मात्र याला अपवाद ठरले. याच सेलिब्रिटींमध्ये कपूर कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावाचाही समावेश होतो. (Kareena Kapoor )

हिंदी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवणाऱ्य़ा या व्यक्तीनं आतापर्यंत त्यांचं घर फार क्वचितच सर्वांच्या भेटीला आणलं असावं. पण, आता मात्र करीना कपूरनं हा रकाना भरला आहे. 

करीनानं तिचे वडील, रणधीर कपूर यांच्या घरातील एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिनं शेअर केलेल्या सेल्फीमध्ये आई बबिताही दिसत आहे, शिवाय वडील रणधीर कपूर यांचीही झलक या फोटोमध्ये दिसत आहे.

करीनाच्या या सेल्फीमध्ये बबिता खीर खाताना दिसत आहेत. तर, रणधीर कपूर यांचा ए मोठा पोट्रेट फोटो भींतीवर लावलेला दिसत आहे. 'आई खीर खात असताना मुलगी फोटोसाठी पोझ देत असते...', असं कॅप्शन करीनानं तिच्या या फोटोला लिहिलं आहे. 

तिनं हा सेल्फी असा काही टीपला आहे ज्यामध्ये घराचाही काही भाज दिसत आहे. कोणत्याही गडद रंगांचा वापर न करता लँपमुळं साजेशी रोषणाई रणधीर कपूर यांच्या घरात केल्याचं पाहायला मिळतं. 

करीना सहसा तिच्या आईवडिलांची भेट घेत असते. काही दिवसांपूर्वी ती जहांगीरसह इथं आली होती. करीनाची बहीण, करिष्मा कपूर हिसुद्धा अनेकदा इथं दिसते. रणधीर कपूर आणि बबिता 1971 मध्ये विवाहबंधनात अडकले. 'कल आज और कल' या चित्रपटानंतर या जोडीनं विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. असं असलं तरीही त्यांनी घटस्फोट मात्र घेतला नव्हता. 

Read More