Marathi News> मनोरंजन
Advertisement

विकी-कतरिनाला मिळणारं प्रेम पाहून दीप-वीर Insecure? सिद्ध करतायेत या गोष्टी

त्यांच्यावरही सर्वांच्या नजरा खिळल्या.   

विकी-कतरिनाला मिळणारं प्रेम पाहून दीप-वीर Insecure? सिद्ध करतायेत या गोष्टी

मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची नावं एकाएकी चर्चेत आली. एकिकडे अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आणि त्यांना चाहत्यांनी डोक्यावरच उचलून धरलं. 

विकी आणि कॅटला यादरम्यान प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळालं. ज्यानंतर दुसरीकडे दीपिका आणि रणवीरनं अशा काही कृती केल्या की त्यांच्यावरही सर्वांच्या नजरा खिळल्या. 

रणवीर आणि दीपिका, कॅट- विकीला मिळणारी लोकप्रियता पाहून Insecure तर नाही ना झाले असाच प्रश्न चाहत्यांनी यावेळी उपस्थित केला. 

हल्लीच दीपिका आणि रणवीरला विमानतळावर पाहिलं गेलं. त्यावेळी तिथंच रणवीरनं पत्नी, दीपिकाला किस केलं. त्याची ही कृती चाहत्यांना काही रुचली नाही. 

अनेकांनीच कमेंट करत यावर आपली प्रतिक्रिया दिली आणि त्यांना निशाण्यावर घेतलं. 
 
लग्नानंतरही कतरिना आणि विकी ज्यावेळी मुंबईत आले तेव्हाही त्यांनी ज्या पद्धतीनं माध्यमांचं आणि चाहत्यांचं प्रेम स्वीकारलं, त्यांचा हा अंदाज पाहण्याजोगा होता. 

सोशल मीडियावर त्यांच्या नावाची हवा झाली ती वेगळीच. पण, या साऱ्यामध्येच दीपिका आणि रणवीरनंही आपल्याकडे माध्यमांचं लक्ष वेधण्याचा पूर्ण प्रयत्न केला. 

31 डिसेंबर 2020 ला तिनं सोशल मीडियावरचे सर्व फोटो आर्काईव्ह केले होते. यामध्ये लग्नाच्या फोटोंचाही समावेश होता. 

पण, जसे कतरिना आणि विकीच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले तसं लगेचच दीपिकानं लग्नाचे फोटो रिशेअर केले. तिनं असं केल्यानंतर नेटकऱ्यांनी काहीसा नाराजीचा सूरही आळवला होता. 

Read More