Marathi News> मनोरंजन
Advertisement

अरेच्चा! नववधूच्या रुपात अचानक समोर येत बॉलिवूड अभिनेत्रीकडून सर्वांनाच धक्का

लालबुंद रंगाच्या या लेहंग्यामध्ये तिचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे.   

अरेच्चा! नववधूच्या रुपात अचानक समोर येत बॉलिवूड अभिनेत्रीकडून सर्वांनाच धक्का

मुंबई : बॉलिवूडमध्ये (Bollywood) लग्नसराईच्या दिवसांना चांगलीच रंगत आली असून, अनेक सेलिब्रिटीही विवाहबंधनात अडकत असल्याचं पाहायला मिलत आहे. सेलिब्रिटींचे विवाहसोहळे म्हटलं की, सर्वांच्याच नजरा लागलेल्या असतात ते म्हणजे या विवाहसोहळ्यांतील सेलिब्रिटींच्या पेहरावाकडे. 

मोठमोठ्य़ा सेलिब्रिटी स्टायलिस्टना अपॉईंट करत ही मंडळी अतिशय सुरेख अशा कपड्यांची निवड करतात. मग काय, एकिकडे विवाहसोहळ्याच्या रोषणाईला झगमगाट तर, दुसरीकडे या कलाकारांच्या पेहरावाची लकाकी, असंच काहीसं चित्र पाहायला मिळतं.

बॉलिवूजमध्ये सध्या अशीच एक अभिनेत्री तिच्या नववधू रुपामुळं चर्चेत आली आहे. हाताला कलिरे, डोक्यावर बिंदी, गळ्यासरशी असणारा मोठा हिरेजडीत हार, लाल रंगाचा चुडा आणि भरजरी लालबुंद रांगाचा लेहंगा, असाच काहीसा लूक या अभिनेत्रीनं केल्याचं पाहायला मिळत आहे. 

जाळीदार ओढणी आणि खाली झुकलेल्या नजरेनं या रुपाला परिपूर्ण करणारी ही अभिनेत्री आहे, क्रिती सेनन ( kriti sanon). क्रिती नव्या नवरीच्या रुपात सोशल मीडियावर अशी चाहत्यांच्या समोर आल्यानंतर पहिला तर, सर्वांनांच धक्का बसला. तिनंही लग्न केलं आहे का, लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे का असे प्रश्न चाहत्यांनी आणि फॉलोअर्सनी विचारण्यास सुरुवात केली. 

क्रितीचा हा संपूर्ण साज एका खास कारणासाठी असून, तिचा हा लूक डिझाईन केला आहे सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यानं. मनिषनं नुकतंच त्याचं नवं 'नूरियत' कलेक्शन सादर केलं. याच निमित्तानं क्रिती नववधू रुपात दिसली. 

fallbacks

fallbacks

fallbacks

fallbacks

पवित्रतेचं प्रतिक असणाऱ्या जरदोसी वर्कला प्रत्येक पिढीनं आश्रय दिला आहे, असं सांगत मनिषनं आपल्या या नव्या कलेक्शनची माहिती दिली. 

 

Read More