Marathi News> मनोरंजन
Advertisement

लारा दत्तानं सोशल मीडिया पोस्ट लिहिताच ऐरणीवर आला तिच्या लग्नाचा मुद्दा

प्रत्येक वेळी या चर्चा चांगल्याच असतील किंवा सकारात्मकच असतील याची काहीच हमी नाही

लारा दत्तानं सोशल मीडिया पोस्ट लिहिताच ऐरणीवर आला तिच्या लग्नाचा मुद्दा

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि एकेकाळी मिस युनिवर्स हा किताब मिळवणारी लारा दत्ता ही कायमच तिच्या रंजक आणि तितक्याच प्रभावी अंदाजासाठी चर्चेत असते. सोशल मीडियावरही ही अभिनेत्री बऱ्यापैकी सक्रीय असते. लारा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिचं स्टाईल स्टेटमेंट आणि अर्थातच सोशल मीडिया पोस्ट. 

कलाकारांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्ट त्यांना चर्चेत आणण्याचं काम करतात. पण, प्रत्येक वेळी या चर्चा चांगल्याच असतील किंवा सकारात्मकच असतील याची काहीच हमी नाही. लारा सध्य़ा अशाच परिस्थितीचा सामना करताना दिसत आहे. 

हल्लीच तिनं 'कू' या अॅपवर तिचा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये तिनं अनेक फोटोंचा एक कोलाज पोस्ट केला होता. यामध्ये तिच्या प्रवासादरम्यानचे आणि मुलीसोबतच्या खास क्षणांचे फोटो होते. या फोटोसह कॅप्शन देत लारानं लिहिलं, 'जेव्हाजेव्हा आयुष्य तुम्हाला काहीसं थांबून पुढे जाणं शिकवत असेल तेव्हा थांबलंच पाहिजे'. या कॅप्शनसह लाराने, #ThankfulTuesday #gratitude #GodisGood #godisinthedetails असे हॅशटॅगही जोडले. 

लारानं हे कॅप्शन लिहिताच ती तिच्या कलाविश्वातील कारकिर्दीला मिस करत असल्याचंच चाहत्यांना वाटू लागलं. एका उत्तुंग झेपेसाठीच सारा आतुर असून, विवाहित आयुष्यामुळं ती थांबली आहे, असाच अनेकांचा समज झाला. तू फक्त वेळेसोबतच तुझ्या वाट्याला येणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाड, बाकी सर्व आमच्यावर सोड असा सल्लाच नेटकरी लाराला देऊ लागले. 

Read More