Marathi News> मनोरंजन
Advertisement

'ही' बॉलिवूड अभिनेत्री पुन्हा एकदा आई होणार; 'बेबी बंप'सह फोटो शेअर

लीजाने एक फोटो पोस्ट केला आहे.

'ही' बॉलिवूड अभिनेत्री पुन्हा एकदा आई होणार; 'बेबी बंप'सह फोटो शेअर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री लीजा हेडन तिच्या फिटनेसमुळे, तिच्या फोटोमुळे चर्चेत असते. लीसा गेल्या अनेक दिवसांपासून कलाविश्वापासून दूर आहे. पण सोशल मीडियावरुन लीजा तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. तिचे अनेक फोटो ती पोस्ट करत असते. नुकतंच लीजाने एक फोटो पोस्ट करत तिच्या चाहत्यांशी एक गोड बातमी शेअर केली आहे.

लीजाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत ती पुन्हा एकदा आई होणार असल्याचं समजतंय. या फोटोमध्ये लीजा, तिचा पती आणि मुलगा जॅक लालवानी दिसत आहे. या फोटोमधून लीजाचे बेबी बंम्बही दिसत आहे. 

 
 
 
 

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon) on

लीजा 2016च्या ऑक्टोबरमध्ये डिनो लालवानीसोबत विवाहबंधनात अडकली. 2017च्या मे महिन्यामध्ये लीजाने तिच्या पहिल्या मुलाला जॅकला जन्म दिला.

लीजा अनेकदा तिच्या पती आणि मुलासोबतचे अनेक फोटो पोस्ट करत असते. 

Read More