Marathi News> मनोरंजन
Advertisement

धक-धक गर्लने दाखवलं तिचं 53 व्या मजल्यावरील घरं, आतून आहे खूपच खास, किंमत पाहून बसेल धक्का

बॉलिवूडची धक-धक गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. नुकतेच अभिनेत्रीने तिच्या मुंबईतील घराचे फोटो शेअर केले आहेत.   

धक-धक गर्लने दाखवलं तिचं 53 व्या मजल्यावरील घरं, आतून आहे खूपच खास, किंमत पाहून बसेल धक्का

Madhuri Dixit Home Inside Photos:  बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असतो. 57 व्या वर्षी देखील माधुरी तिच्या लुकने चाहत्यांना घायाळ करत असते. इतकंच नाही तर माधुरी दीक्षित लक्झरी लाईफ जगते. नुकतेच अभिनेत्री माधुरी दीक्षितने तिच्या मुंबईतील घराचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्रीच्या घरातील प्रसिद्ध चित्रकार एम एफ हुसेन यांच्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. माधुरी दीक्षितचे मुंबईतील घर हे 53 व्या मजल्यावर आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, माधुरी दीक्षितच्या मुंबईतील घराची किंमत सुमारे 48 कोटी रुपये आहे. घराच्या बाल्कनीतून मुंबईचे विहंगम दृश्य तुम्हाला पाहता येते. त्यासोबत माधुरीने तिच्या घरामध्ये ज्याप्रकारे काही वस्तू ठेवल्या आहेत. त्या पाहिल्यानंतर तुम्ही देखील तुमचे घर अशाप्रकारे ठेवण्याचा प्रयत्न कराल. 

एम एफ हुसेन यांची कला

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचे एम एफ हुसैन हे मोठे चाहते होते. त्यांनी खासकरून अभिनेत्री माधुरी दीक्षितसाठी काही पेंटिंग्ज बनवल्या होत्या. त्यांनी दिलेल्या या पेंटिंगमुळे माधुरीच्या घराची शोभा आणखी वाढली आहे. त्यांच्या या कलेचं चाहते देखील भरभरून कौतुक करत आहेत. एम एफ हुसेन यांच्यासोबतच डान्सिंग वुमन यांचे देखील काही पेंटिंग किचन रुममध्ये पाहायला मिळत आहेत. माधुरीच्या या मुंबईतील घराचे फोटो पाहून चाहत्यांनी देखील तिच्या फोटोंवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. सोशल मीडियावर देखील तिच्या घराचे फोटो व्हायरल होत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अभिनेत्रीच्या मुंबईतील घराच्या लिव्हिंग एरियामध्ये निळा सोफा बॅक्स्टरने डिझाइन केला आहे. तसेच तिथे टेबल आणि खुर्च्या देखील ठेवण्यात आल्या आहेत. त्यासोबत घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तू या देखील घराचं सौंदर्य वाढवत आहेत. 

माधुरी दीक्षितचा आगामी चित्रपट

कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3' चित्रपटात माधुरी दीक्षित देखील दिसणार आहे. 'भूल भुलैया 3' हा चित्रपट 1 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये कार्तिक आर्यनसह विद्या बालन देखील दिसणार आहे. या चित्रपटात विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांचा खास डान्स देखील असणार आहे. 

Read More