Marathi News> मनोरंजन
Advertisement

मलायका अर्जुनऐवजी हल्ली 'याच' व्यक्तिसोबत फिरतेय; Boyfriend दूर का?

काही दिवसांपासून मात्र मलायका आणि अर्जुन यांच्या नात्यात दुरावा येत आहे

मलायका अर्जुनऐवजी हल्ली 'याच' व्यक्तिसोबत फिरतेय; Boyfriend दूर का?

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं नातं सध्या 'टॉक ऑफ द टाऊन' झालं आहे. वयाचं अंत असतानाही अर्जुन आणि मलायकाच्या प्रेमात मात्र कोणत्याही प्रकारचं अंतर नाही, हेच त्यांना एकत्र पाहून लक्षात येत आहे. पण, आता म्हणे मागच्या काही दिवसांपासून मात्र मलायका आणि अर्जुन यांच्या नात्यात दुरावा येत आहे. (Malaika Arora Arjun kapoor)

मुळात हा दुरावा म्हणजे, मलायका सतत एकाच व्यक्तीसोबत फिरताना दिसतेय. नुकतंच तिनं बहीण अमृता अरोरा हिच्या वाढदिवसाच्या पार्टीलाही हजेरी लावली होती. 

हजेरी लावतेवेळी तिच्यासोबत अर्जुन नव्हे तर एक वेगळा चेहरा दिसला. हाच चेहरा तिला हल्ली साथ देताना दिसतोय. 

मलायकासोबत हिंडणारी ही खास व्यक्ती आहे, तिचाच मुलगा अरहान खान. अरहान परदेशात शिक्षण घेतो असं म्हटलं जातं. 

सध्या तो भारतात आल्यामुळं मलायका त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसते. परिणामी अर्जुन आणि तिचं बाहेर पडणं तुलनेनं कमी झालं असावं. 

मलायकाच्या बहिणीच्या बर्थडे पार्टीला ती अरहानसोबत आली असली, तरीही अर्जुनही या पार्टीला आला होता. 

fallbacks

आपल्या प्रेयसीच्या बहिणीचा बर्थडे बॅश आणि तिथं अर्जुन नाही हे कसं शक्य? अर्जुनचं त्या पार्टीला येणं अर्थातच चार चाँद लावणारं होतं. 

fallbacks

काही दिवसांपूर्वीच या जोडीच्या ब्रेकअपच्या चर्चा आल्या पण, इथं मात्र हम अपनी मस्ती मे.... असं म्हणत अफवा धुडकावून लावत ही जोडी आणि त्यांचं प्रेम गाजतंय असं म्हणायला हरकत नाही. 

Read More