Marathi News> मनोरंजन
Advertisement

अर्जुन कपूरसोबत ब्रेक-अपनंतर पुन्हा प्रेमात पडली मलायका अरोरा! Photos Viral, कोण आहे तो?

Malaika Arora Dating Love Affairs: मलायका अरोराचा त्या व्यक्तीसोबतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

अर्जुन कपूरसोबत ब्रेक-अपनंतर पुन्हा प्रेमात पडली मलायका अरोरा! Photos Viral, कोण आहे तो?

Malaika Arora Dating Love Affairs: बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री मलायका अरोरानं पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. मलायकानं पंजाबी गायक एपी ढिल्लोनंच्या कॉन्सर्टमध्ये ती काल दिसली होती. मलायका यावेळी त्याच्या गाण्यांची मज्जा घेत त्यावर डान्स करताना दिसली. इतकंच नाही तर एपी ढिल्लोननं मलायका अरोराला स्टेजवर देखील बोलावलं. या सगळ्या ज्या गोष्टीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं तो म्हणजे मलायकाचा मिस्ट्री मॅन...

मलायका अरोरानं तिचा स्टायलिस्ट राहुल विजयसोबत या कॉन्सर्टमध्ये हजेरी लावली होती. त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. मलायकानं यावेळी राहुलसोबतचे हे फोटो वीथ यू या एपी ढिल्लोनच्या गाण्यासोबत शेअर केले. तर स्वत: एपी ढिल्लोननं या त्याच्या कॉन्सर्टमधील मलायकासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात एपी ढिल्लोन हा स्वत: खाली जाऊन मलायकाचा हात धरून तिला स्टेजवर घेऊन येतो. हा व्हिडीओ शेअर करत त्यानं कॅप्शन दिलं आहे की 'पहले प्यार दी पहली कहानी' वीथ यू या त्याच्या गाण्यातील एक ओळ लिहिली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरनं एका कार्यक्रमात हजेरी लावली असाताना तो सिंगल आहे असा खुलासा केला होता. तर दुसरीकडे आता मलायका ही कोणासोबत आहे याची माहिती सगळ्यांना जाणून घ्यायची आहे. मलायकानं त्यानंतर यावर एक नोट शेअर केली त्यात लिहिलं होतं की प्रत्येक सकारात्मक विचार ही एक शांतपणे करण्यात आलेली प्रार्थना आहे जी तुमचे जीवन बदलेल. शुभ सकाळ, तुमचा दिवस चांगला जावो'. त्यानंतर तिनं तिचं रिलेशनशिप स्टेटसवर अपडेट देत लिहिलं की माझं स्टेटस सध्या रिलेशनशिपमध्ये आहे, सिंगल, हेहे..

fallbacks

मलायका अरोरा आणि राहुल विजय रिलेशनशिपमध्ये?

मलायका अरोरा आणि राहुल विजय हे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. ते दोघं सतत डिनर डेटवर जाताना दिसत आहेत. या आधी मलायका ही अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दरम्यान, मलायका आणि अर्जुन कपूर हे दोघं 2018 मध्ये रिलेशनशिपमध्ये आले. 

Read More