Marathi News> मनोरंजन
Advertisement

बॉलिवूडची ही हसिना आज 'प्रोफेशनल पोकर प्लेअर'

...तर पुन्हा बॉलिवूडमध्ये परतेन

बॉलिवूडची ही हसिना आज 'प्रोफेशनल पोकर प्लेअर'

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मिनिषा लांबा 'बचना ए हसीनो' या रणबीर कपूरसोबतच्या चित्रपटातून ती प्रसिद्धीझोतात आली. त्यानंतर मिनिषा इंडस्ट्रीपासून काहीशी दूर आहे. मात्र आता मिनिषा एका वेगळ्याचं कारणामुळे चर्चेत आली आहे. मिनिषा अभिनय सोडून एका दुसऱ्याच ठिकाणी आपलं नशीब आजमावत आहे. 

मिनिषा लांबा आता प्रोफेशनल पोकर प्लेअर बनली आहे. मिनिषाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याबाबतची माहितीही दिली आहे. 'वर्ल्ड सीरीज ऑफ पोकर खेळण्याचा अनुभव अतिशय छान होता. या खेळाच्या शेवटी मी, ११३० खेळाडूंपैकी ६४व्या स्थानावर असल्याचं' म्हणत तिने पोस्ट शेअर केली आहे.

'मुंबई मिरर'शी संवाद साधताना मिनिषाने याबाबतची माहिती दिली. 'पोकरविषयी मला माझ्या एका मित्राने सांगितलं. आधी मी यापासून दूरच होती. परंतु मी हा खेळ खेळायला शिकली, त्यानंतर मला या खेळात यश मिळू लागल्याचं' तिने म्हटलंय.

बॉलिवूड करियरविषयी बोलताना तिने, 'मला ज्याप्रकारच्या भूमिका करायच्या होत्या त्याप्रकारच्या चांगल्या भूमिका मिळत नव्हत्या. म्हणून सध्या चित्रपटांपासून मी दूर आहे. मात्र चित्रपटात एखादी चांगली भूमिका साकारण्याची इच्छा आहे. ज्यावेळी चित्रपटांसाठी चांगल्या भूमिका मिळतील त्यावेळी पुन्हा बॉलिवूडमध्ये परतेन. सध्या टेलिव्हिजन आणि वेबसाठी ऑफर येत असल्याचं' असं तिने सांगितलं.

मिनिषाने २००५ मध्ये 'यहाँ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'किडनॅप', 'जिला गाजियाबाद', 'वेलडन अब्बा' यांसारख्या चित्रपटांतून तिने भूमिका साकारल्या. 'बिग बॉस'च्या ८व्या पर्वात मिनिषाने सहभागी झाली होती. 

Read More