Marathi News> मनोरंजन
Advertisement

लग्नानंतर 'या' बॉलिवूड अभिनेत्रीकडून टॉपलेस फोटो शेअर


लग्नानंतरही बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडणारी 'ही' अभिनेत्री आहे तरी कोण?

 लग्नानंतर 'या' बॉलिवूड अभिनेत्रीकडून टॉपलेस फोटो शेअर

मुंबई : बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असतात. या फोटोंच्या माध्यमातून त्या चाहत्यांशी कनेक्ट असतात. आता अशाच एका अभिनेत्रीने सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे तिचे नुकतेच लग्न झाले असल्या कारणाने तिच्या या बोल्ड फोटोंची खुपच चर्चा रंगलीय. नेमकी ही अभिनेत्री कोण आहे ते जाणून घेऊयात. 

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय आपल्या अभिनयासह बोल्ड फोटोशुटमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतेच काही महिन्यापुर्वी तीचे लग्न झाले आहे. या लग्नानंतर तिने बोल्ड फोटोशूट केले आहे. हे फोटो तिने आता सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

फोटोत काय? 
मौनी रॉय बीचवर बसलेली दिसत आहे. या फोटोंमध्ये मौनीची बॅकसाइड दिसत आहे. अंगावर नुसती चादर गुंडाळून कपड्यांशिवाय ती बसलेली आहे. या फोटोत दूरवर फक्त निळा समुद्र दिसतो. मौनी या संपुर्ण दृश्याचा आनंद घेत आहे.

fallbacks

दरम्यान मौनीच्या या लूकवर चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या या फोटोंवर काही तासांत लाखो लाईक्स आले आहेत. त्याचबरोबर चाहत्यांनीही तिला हॉट म्हणत अनेक कमेंट्सही केल्या आहेत.

मौनी रॉय सध्या अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामुळे चर्चेत आहे. यानंतर ही अभिनेत्री 'माया जाला' या सिंहली चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटातून ती सिंहली इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे.

Read More