Marathi News> मनोरंजन
Advertisement

'नो मेकअप सेल्फी'वरुन खिल्ली उडवणाऱ्याची नम्रताकडून कानउघडणी

नम्रता शिरोडकर ही दाक्षिणात्य अभिनेता महेशबाबू याची पत्नी आहे.

'नो मेकअप सेल्फी'वरुन खिल्ली उडवणाऱ्याची नम्रताकडून कानउघडणी

मुंबई : तेलुगू चित्रपटसृष्टीत लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या अभिनेता महेशबाबू याच्याविषयी नव्याने काही वेगळं सांगण्याची गरज नाही. फक्त दाक्षिणात्य कलाविश्वातच नव्हे तर, विविधभाषी प्रेक्षकांमध्येही त्याची चांगलीच लोकप्रियता आहे. असा हा अभिनेता 'महर्षी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. महेशबाबूचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतानाच त्याची पत्नी, अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले. चित्रपटाचं यश साजरा करतेवेळीचे हे फोटो असून, नम्रतावर हे फोटो पोस्ट करण्यामुळे टीकाही करण्यात आली. 

'महर्षी'च्या यशानिमित्त नम्रताने त्यांच्याच घरी एका पार्टीचं आयोजन केलं होतं त्यावेळचेच काही सेल्फी तिने मोठ्या आनंदात सोशल मीडियावर पोस्ट केले. "Super duper successful #maharshi thanku @directorvamshi for an epic blockbuster whatta night", असं कॅप्शन तिने त्यापैकीच एका सेल्फीवर दिलं. नम्रताने पोस्ट केलेल्या या फोटोंपैकीच एका फोटोवर इन्स्टाग्राम युजरने तिच्यावर टीका केली. 

'नम्रता तू जरा मेकअप वगैरे का करत नाहीस? तू नैराश्याचा वगैरे सामना करत आहेस का?', त्याची ही कमेंट पाहता नम्रताने थेट शब्दांत त्याला उत्तर दिलं. 'तुम्हाला मेकअप केलेल्या महिला आवडत असतील. त्यामुळे नेहमीच मेकअप करणाऱ्या आणि तुमचं प्राधान्य असणाऱ्या कोणा एकाला तुम्ही फॉलो करा. कारण, तशा प्रकारटी कोणतीही पोस्ट तुम्हाला या पेजवर दिसणार नाही आहे. त्यामुळे इथून तुम्ही बाहेरच पडा.... ही विनंती', असं सडेतोड उत्तर नम्रताने त्या युजरला दिलं. 

fallbacks

कलाकारांना निशाण्यावर धरुन त्यांची खिल्ली उडवणाऱ्यांना नम्रताने दिलेलं हे उत्तर पाहता सोशल मीडियावर याचीच चर्चा होत आहे. तिने आपली बाजू स्पष्ट केल्यानंतर अनेक इतर युजर्सनी सोशल मीडियाच्याच माध्यमातून कमेंट बॉक्समध्ये एखाद्याच्या रुपावरुन त्याच्याविषयीचे अंदाज बांधण्याच्या वृत्तीची निंदाही करण्यात आली. 

Read More