Marathi News> मनोरंजन
Advertisement

ex-boyfriend सिद्धार्थ मल्होत्रावर का संतापली कियारा? नेमकं असं काय घडलं

पण आता त्या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना त्यांच्या चाहत्यांनी नाही तर खुद्द कियारानेच खतपाणी घातले आहे.

ex-boyfriend सिद्धार्थ मल्होत्रावर का संतापली कियारा? नेमकं असं काय घडलं

मुंबई: बॉलीवूडमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या ब्रेकअपच्या चर्चा आता कुठे कमी झाल्या होत्या. पण आता त्या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना त्यांच्या चाहत्यांनी नाही तर खुद्द कियारानेच खतपाणी घातले आहे. सध्या कियाराने सिद्धार्थला उद्देशून एक इन्स्टा स्टोरी पोस्ट केली आहे. त्यामुळेच कियारा आणि सिद्धार्थ हे कपल पुन्हा एकदा चर्चेत आलं. 

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडली होती. ब्रेकअपनंतर आजही त्यांना एकत्र पाहताना चाहत्यांना कोण आनंद होतो. त्या दोघांनी अद्याप आपल्या ब्रेकअपबद्दल जाहीरपणे खुलासा केलेला नाही परंतु ते अनेकदा एकत्र स्पॉट होतात. नुकतेच ते दोघं एकत्र दुबईमध्ये स्पॉट झाले होते जिथे त्यांनी कियाराचा वाढदिवस एकत्र साजरा केला होता. हे कपल त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांमुळे रडारवर होते त्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा थोड्याफार प्रमाणात ओसरल्या होत्या पण आता पुन्हा एकदा कियारा अडवाणीच्या या पोस्टमुळे त्यांचे नाते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पण हे नेमकं प्रकरण आहे काय हे जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

fallbacks

कियाराने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे, ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, 'सिद्धार्थ मल्होत्रा तू बातें तो बड़ी बड़ी करता था, लेकिन तू भी 'आउट ऑफ साइट, आउट ऑफ माइंड' टाइप का बंदा निकला'. कियाराची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्या या पोस्टवर सिद्धार्थने आपली प्रतिक्रिया मांडली आहे. सिद्धार्थ मल्होत्राने कियाराची पोस्ट शेअर करत लिहिले, 'ओए सरदारनी मुझे ना सब याद है भूल ही नहीं सकता। आज 6 बजे मिलने आ जाउंगा'. कियाराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सिद्धार्थची ही पोस्ट देखील शेअर केली. 

fallbacks

खरे कारण आले समोर...
त्या दोघांनी ही पोस्ट एका खास कारणासाठी शेअर केली आहे आणि ते कारण म्हणजे आज त्यांचा शेरशाह हा चित्रपट रिलिज होऊन एक वर्ष झाले आहे. 'शेरशाह' या चित्रपटात कियारा आणि सिद्धार्थची जोडी दिसली होती. चाहत्यांना ही जोडी खूप आवडली. यासाठी त्या दोघांनी संध्याकाळी सहा वाजता इंस्टाग्रामवर लाईव्हही घेतले आहे. 'शेरशाह' या चित्रपटाला आज 1 वर्ष पूर्ण झाले आहे. या चित्रपटाला तसेच या जोडीला लोकांनी भरभरून प्रेम दिले. याप्रसंगी त्यांनी प्रेक्षकांचे त्यांना मिळालेल्या प्रेमाबद्दल आभारही मानले आहेत.  

Read More