Marathi News> मनोरंजन
Advertisement

Priyanka - Nick 'या' आलिशान घरात करणार लेकिचं स्वागत फोटो पाहून म्हणाल 'क्या बात'

सोन्याच्या पावलांनी लेक येणार घरात... 

Priyanka - Nick 'या' आलिशान घरात करणार लेकिचं स्वागत फोटो पाहून म्हणाल 'क्या बात'

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती, अमेरिकन गायक निक जोनास या दोघांनीही मोठ्या उत्साहात आपल्या लेकिच्या जन्माची बातमी शेअर केली. प्रियांका आणि निक या दोघांनाही सरोगसीच्या माध्यमातून एक मुलगी झाल्याचं म्हटलं जात आहे.

आता म्हणे ही जोडी त्यांच्या लेकीच्या स्वागतासाठी स्वत:ही सज्ज होत आहे आणि त्यांचं घरही सज्ज करत आहेत. (Priyanka chopra Nick jonas)

अद्यापही प्रियांकाची मुलगी ही प्रसूतपूर्व काळाज जन्मल्यामुळे तिची जास्तच काळजी घेतली जात आहे. ती 'निक्यांका'च्या घरी येण्यासाठीही काहीसा वेळ जाणार आहे. 

असं असलं तरीही प्रियांका आणि निक ही दोघंही आता मुलीच्या स्वागतासाठी सारं घर सज्ज करत आहेत. 

प्रियांकाचं लॉस एंजलिसमधील घर हे कोणा एका महालाहून कमी नाही. सूत्रांच्या माहितीनुसार या आलिशान घराची किंमत 22 मिलियन डॉलर म्हणजेच 144 कोटी रुपये इतकी आहे. 

आलिशान जीवनाच्या सर्व सुखसोयी त्यांच्या या घरात आहे. प्रियांका आणि निकला पाळीव प्राण्यांची विशेष आवड. 

ज्यामुळं या घरात प्राण्यांसाठी खास जागा आहे. नैसर्गिक सौंदर्याची या घराच्या अवतीभोवती मुक्तहस्ताने उधळण झाल्याचं पाहायला मिळतं. 

fallbacks

fallbacks

स्वयंपाक घरापासून ते अगदी लिविंग रुम आणि स्विमिंग एरिया, जीमच्या बाबतीतही प्रियांकाचं घर कायमच सर्वांच्या नजरा वळवतं. 

आता या घरात कमतरता होती ती म्हणजे चिमुकल्या पावलांची. अखेर ती सरही भरुन निघाली आहे. प्रतीक्षा आहे ती म्हणजे सोन्याच्या पावलांनी लेकिला घरात आणण्याची... घराचं गोकुळ होण्याची. 

Read More