Marathi News> मनोरंजन
Advertisement

इन्स्टाग्रामच्या एका पोस्टसाठी प्रियंकाला तब्बल इतके कोटी

बॉलिवूड कलाकारांपैकी इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये एकमेव प्रियंका चोप्राचं नाव

इन्स्टाग्रामच्या एका पोस्टसाठी प्रियंकाला तब्बल इतके कोटी

मुंबई : बॉलिवूड देसी गर्ल प्रियंका चोप्रा ग्लोबल स्टार बनली आहे. प्रियंकाने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही नाव कमावलं आहे. सोशल मीडियावर प्रियंका नेहमी अॅक्टिव्ह असते. नुकतंच प्रियंकाचं नाव इन्स्टाग्राम रिच लिस्टमध्ये सामिल झालं आहे. इन्स्टाग्रामवर या यादीमध्ये सामिल होणारी प्रियंका एकमेव बॉलिवूड अभिनेत्री आहे.

इन्स्टाग्रामच्या शेड्यूलिंग टूल HopperHQ कडून Instagram rich list 2019 ही यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये बॉलिवूड कलाकारांपैकी एकमेव प्रियंका चोप्राचं नाव आहे. ती या यादीमध्ये १९व्या क्रमांकावर आहे. तर याच्या उप-गटामध्ये ती १६व्या स्थानी आहे. 

जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार, प्रियंकाला एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी १ कोटी ८७ लाख रुपये दिले जातात. प्रियंकाचे इन्स्टावर ४३.४ मिलीयन फॉलोवर्स आहेत. 

 
 
 
 

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

प्रियंका सोशल मीडियावर हायपरअॅक्टिव्ह आहे. ती अनेकदा ब्रॅन्डसह कॉलॅबरेट करुन त्यांना इन्स्टावर प्रमोट करते, त्याबदल्याद तिला कोटींच्या घरांत रक्कम दिली जाते. 

प्रियंकाशिवाय या यादीमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावाचाही समावेश आहे. इन्स्टाच्या या रिच लिस्टमध्ये विराट २३व्या क्रमांकावर आहे. विराट एका पोस्टसाठी १ कोटी ३५ लाख रुपये कमवतो. कायली जेनर या यादीच्या सर्वात पहिल्या स्थानी आहे.

Read More