Marathi News> मनोरंजन
Advertisement

प्रियांकाच्या ब्रायडल शॉवरला बी-टाऊन अभिनेत्रींची हजेरी

जाणून घ्या 'त्या' अभिनेत्री आहेत तरी कोण?   

प्रियांकाच्या ब्रायडल शॉवरला बी-टाऊन अभिनेत्रींची हजेरी

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्राचं वेळापत्रक तसं फारच व्यग्र असतं. पण, सध्या मात्र ती कामापेक्षा जास्त लक्ष आपल्या खासगी आयुष्यावर देत आहे. कलाविश्वात आपली ओळख प्रस्थापिक केल्यानंतर आणि लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्यानंतर आता प्रियांका अमोरिकन गायक निक जोनास याच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. 

अवघ्या काही दिवसांतच निक आणि प्रियांकाची लग्नगाठ बांधली जाणार आहे. त्याआधीच त्यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनला मोठ्या दणक्यात सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

प्रियांकासाठी तिच्या मैत्रिणींनी नुकत ब्रायडल शॉवरचं आयोजन केलं होतं. यावेळी त्या पार्टीत 'देसी गर्ल'ने एकच कल्ला केल्याचं पाहायला मिळालं. 

निक या पार्टीमध्ये हजर राहू शकला नसला तरीही प्रियांकाने पोस्ट केलेल्या फोटोंच्या माध्यमातून तोसुद्धा या साऱ्याचा भाग झाला होता.

न्यूयॉर्कच्याच एका कॅफेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या पार्टीला प्रियांकाच्या मैत्रिणींची उपस्थिती होती. यामध्ये तिच्या बी- टाऊनमधील मैत्रिणीही दिसल्या. 

तिच्या आनंदात सहभाग होण्यासाठी पोहोचलेल्या मैत्रिणी म्हणजे अभिनेत्री नीतू कपूर आणि सोनाली बेंद्रे. 

नीतू यांनी सोशल मीडियावर या पार्टीतील काही फोटो पोस्ट केले. ज्यामध्ये सोनाली बेंद्रेही आनंदात दिसत आहे. 

सोनाली सध्या कॅन्सरच्या उपचारासाठी परदेशात आहे, तर नीतू सिंग सुद्धा पती, अभिनेते ऋषी कपूर यांच्यावरील उपचारासाठी परदेशात आहे. त्यामुळे या अभिनेत्रींचं वरचेवर भेटणं आणि धमाल करणं सुरुच असतं. 

दरम्यान, प्रियांकाच्चया लग्नाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसं वातावरम अधिकत रंगतदार होत असून, दर दिवशी तिच्या लग्नाशी निगडीत माहिती समोर येत आहे. परिणामी चाहत्यांमध्ये 'देसी गर्ल'च्या विवाहसोहळ्याचीच  चर्चा रंगल्याचं चित्र आहे. 

Read More