Marathi News> मनोरंजन
Advertisement

Priyanka Chopra - Nick Jonas Divorce : पाहा, घटस्फोटाच्या चर्चांवर निक- प्रियांकाची पहिली प्रतिक्रिया

अनेक कलाकारांनी त्यांच्या घटस्फोटाची जाहीर माहिती देण्यापूर्वी... 

Priyanka Chopra - Nick Jonas Divorce : पाहा, घटस्फोटाच्या चर्चांवर निक- प्रियांकाची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : बॉलिवूड आणि हॉलिवूड अशा दोन्ही कलाजगतांमध्ये चर्चेत असणारी एक जोडी म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती, निक जोनास. निक आणि प्रियांका या दोघांनाही त्यांच्या या नात्यानंही बरीच लोकप्रियता दिली. पण, आता अचानकत या जोडीच्या घटस्फोटाच्या चर्चांनी सर्वांना हादरा दिला. 

प्रियांका चोप्रा  (Priyanka Chopra) हिनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरील बायोमधून पती निक जोनास (Nick Jonas) याचं आडनावही हटवलं आहे, यामुळं चर्चांना अधिकच वाव मिळाला. 

अनेक कलाकारांनी त्यांच्या घटस्फोटाची जाहीर माहिती देण्यापूर्वी अशाच पद्धतीनं कृती केल्याचं पाहायला मिळाल्यामुळं आता 'निक्यांका'सुद्धा याच पावलावर पाऊल ठेवतायत का, असा प्रश्न अनेकांना पडला. 

आपल्या नात्याबाबत होणाऱ्या या सर्व चर्चांवर आता प्रियांका आणि निकही एका वेगळ्या अंदाजात व्यक्त झाले आहेत.

निकनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो बायसेप्स एक्सरसाईज करताना दिसत आहे. 

निकच्या या व्हिडीओवर त्याची पत्नी, प्रियांका व्यक्त झाली आहे. 'Damn, I just died in your arms' अशी कमेंट तिनं इथे केली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nick Jonas (@nickjonas)

निक आणि प्रियांकामधील हा संवाद पाहता, घटस्फोटाच्या या चर्चांना त्यांनी चांगलंच उधळून लावलं आहे असं म्हणायला हरकत नाही. 

fallbacks

दरम्यान, प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनीही या चर्चता उथळ असल्याचं म्हणत कोणत्याही अफवा न पसरवण्याचं आवाहन सर्वांना केलं आहे. 

Read More